अरे देवा, नाशिकमध्ये आणखी एका बसला आग

Published on -

Maharashtra News:नाशिकच्या औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात आज पहाटेच्या सुमारास बसला आग लागल्याची घटना घडली होती.

त्यानंतर नाशिकच्या वणीच्या सप्तश्रृंगी गडावर चालत्या एसटी बसने पेट घेतला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या या बसला अचानक आग लागली. सुदैवाने या दुसऱ्या घटनेत सर्व प्रवासी सुखरूप आहे.

काही तासांच्या अंतरानेच बसला आग लागण्याच्या घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्व ऐरणीवर आला आहे. आज दुपारी नांदूरहून वणी गडावर बस जात असताना ही घटना घडली आहे.

सुदैवाने या घटनेत बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने आग अटोक्यात आणली. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

बसला आग लागल्यानंतर प्रवाशांनी गाडीतून उड्या मारून आपला जीव वाचवला आहे. आगीत एसचीच्या बसचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर मार्गावर वाहतूककोंडी झाली.

यापूर्वी पहाटे मिरची हॉटेल जवळ झालेल्या घटनेत १२ प्रवाशांचा जागीच जळून मृत्यू झाला तर जवळपास ३३ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना ताजी असतानाच वणी गडावर बसला आग लागण्याची दुसरी घटना घडली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News