अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नदीचे शुद्धीकरण करण्यासाठी कोट्यवधीचा खर्च करत असताना दुसरीकडे मात्र नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या गावात याविरुद्ध चित्र दिसत आहे.
ग्रामपंचायतकडून गावातील मैला टँकरमध्ये भरून तो नदीच्या पाण्यात सोडण्यात येत आहे. सध्या नदीला चांगले पाणी वाहत आहे. त्यामुळे हा मैला या पाण्यात मिसळून सर्व पाणी दूषित होत आहे.

याच परिसरात मोठ्या प्रमाणात नदीच्या काठावर शेती असून अनेक शेतकरी हेच पाणी शेतीसाठी व पिण्यासाठी वापरतात.मात्र या पाण्यात मैला सोडल्याने हे पाणी पिल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
ग्रामपंचायतचा कचरा डेपो देखील नदीच्या कडेला असल्याने हा कचरा नदीच्या पाण्यात पसरून हे पाणी दूषित झाल्याने आजूबाजूच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
ग्रामपंचायत कडूनच नागरीकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. तरी याबाबत त्वरित दखल घ्यावी अशी मागणी माजी उसरपंच शरद पवार यांनी अर्जाद्वारे ग्रामपंचायतकडे केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













