Sushama Andhare : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केंद्रीय मंत्र्यांना टोला लगावला आहे. सुषमा अंधारे या सतत शिंदे गट आणि भाजपवर टीका करत असतात. शिवसेनेची धगधगती मशाला म्हणून सुषमा अंधारे यांना ओळखले जात आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी शिवसेना सपंली असे वक्तव्य केले होते. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांना सभेच्या गर्दीवरून टोला लगावला आहे. त्यामुळे आता सुषमा अंधारे यांच्या टीकेला राणे प्रत्युत्तर देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सुषमा अंधारे यांनी कोल्हापूर मध्ये सभा घेतली. त्यावेळी त्या म्हणाल्या, अरे माझ्या सभेची ही गर्दी बघ.. पाक धुरळा उडाला आहे, अशा खोचक शब्दात त्यांनी राणेंना टोला लगावला आहे.
पुढे बोलताना त्यांनी भाजपवरही सडकून टीका केली आहे. त्या म्हणाल्या, भाजपाकडून द्वेषमूलक राजकारणाची पेरणी केली जात आहे. भाजपच्या आयटी सेलमधून धर्म आणि जातीचं विष पेरलं जात आहे. लोकालोकांमध्ये भेद निर्माण जात आहे. हे उद्याच्या राजकारणासाठी घातक आहे.
पुढे बोलताना अंधारेंनी शिंदे गटाच्या आमदारांनाही टोला लगावला आहे. त्या म्हणाल्या, शिंदे गटातील 40 मधील 20 आमदार हे उड्या मारण्यात माहीर आहेत. यातील अनेकांना उद्या भाजपमध्ये जाण्याशिवाय गत्यंतर नाही.
तुम्ही आम्हाला ना ईडी लावू शकत, ना सीडी काढू शकता. फार फार तर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करू शकता. गेल्या दोन दिवसांपासून तर ती सुरूच आहे, असेही अंधारे म्हणाल्या आहेत.
दोन कोटी लोकांना रोजगार देऊ म्हणाला होतात, मिळाला का रोजगार? जी आश्वासनं तुम्ही दिली होती त्याबद्दल आम्ही विचारतोय. वेगळं काही करत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
सुषमा अंधारे किती महिन्यांपूर्वी शिवसेनेत आल्या हे महत्त्वाचं नाही. सुषमा अंधारे जे प्रश्न उपस्थित करत आहेत, त्याची उत्तरे द्या. ते प्रश्न महत्त्वाचे आहेत. आहेत का तुमच्याकडे उत्तर? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी केला आहे.
कोल्हापुरात बोलताना सुषमा अंधारे यांनी भाजपाला चांगलेच धारेवर धरले होते. भाजपवर सडकून टीका करताना त्या म्हणाल्या, मला दुसऱ्या पक्षातून आलेलं पार्सल म्हणता मग तुमच्याकडे आलेले कोण आहेत? तुमच्याकडे 50% राष्ट्रवादीचे, 25% काँग्रेसची आणि 15 टक्के आमचे भाऊ तुमच्याकडे आले आहेत.
तुमचा भाजपवाल्यांचा आकडा आहे तरी किती? भाजपची अवस्था कशी झालीय माहीत आहे का? आपली लेकरं रस्त्यावर फिरतात आणि दुसऱ्याच्या लेकरांना येतोस का विचारत आहेत, अशी यांची अवस्था झाली आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे.