अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- नगर-मनमाड महामार्गाने आणखी एक बळी घेतला. गेल्या पंधरा दिवसात चार जणांना या महामार्गावरील खड्ड्यांमुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
गुहा येथील प्रेरणा पतसंस्थेचे संचालक आप्पासाहेब चंद्रे (वय ४२ ) हे काल सायंकाळी दुचाकीवरून चालले असतांना एका हाॕटेलजवळ खड्ड्यात आदळून ते गंभीर जखमी झाले होते.
त्यांच्यावर नगर येथे खासगी रूग्णालयात उपचार सुरू आसतानाच त्यांचा मृत्यू झाला. आप्पासाहेब बाप्पू चंद्रे (वय ४२ ) हे गेल्या दहा वर्षापासून प्रेरणा पतसंस्थेचे संचालक होते.
त्यांच्या निधनाने गुहा परिसरात शोककळा पसरली असून प्रेरणाचे अध्यक्ष सुरेशराव वाबळे यांच्यासह संचालकांनी शोक व्यक्त केला आहे. नगर-मनमाड महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे.
रस्त्यात मोठे खड्डे पडले आसून अपघातात वाढ झाली आहे. खड्ड्यांमुळे अनेक वाहनचालकांनी आपला मार्ग बदलला असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. रूग्णवाहिका चालकही रूग्ण नेण्यास नकार देत असल्याने आता नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम