अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- समोर चाललेल्या कंटनेर चालकाने अचानक ब्रेक मारल्याने झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अहमदनगर – पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील जातेगाव शिवारात घडली आहे.
मृतांमध्ये पिता पुत्राचा देखील समावेश आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास पारनेर तालुक्यातील जातेगाव शिवारातुन पुण्यावरून नगरकडे चाललेल्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या ट्रकची या कंटेनरला जोराची धडक बसली.
दरम्यानच्या काळात दोन्ही वाहनांच्या मधोमध चाललेल्या दुचाकीलाही ट्रकने ठोकर दिल्याने दुचाकी ट्रकखाली जाउन त्यावरील बापलेकाचा जागीच मृत्यू झाला. अचानक ब्रेक लावण्यात आल्याने ट्रकमधील पाईप बॉडी तोडून केबीनमध्ये शिरले. त्यात दोन्ही ट्रकच्या चालकाचा मृत्यू झाला आहे.
पाठीमागून आदळल्याने ट्रकमधील सळ्यांमध्ये दबल्याने शुभम राजू देशभ्रतार (वय -२४ रा. चनेली पो. दुधाडा. ता. काटोल. जि. नागपूर) व राहुल मधुकर डोंगरे (वय – ३१ रा. पावली ता. कारंजा जि. वर्धा) हे दोघे ट्रक ड्रायव्हर ठार झाले
तर या दोन ट्रकच्या मध्ये अपघातग्रस्त झालेली मोटारसायकल (क्र.एम.एच.२१ डी.एल. ४६५५) वरील पिता पुत्र राजाभाऊ विष्णू चव्हाण (वय – ५०) व मुलगा पुरुषोत्तम राजाभाऊ चव्हाण (वय – २० रा. जातेगाव ता.गेवराई . जि . बीड) हे दोघे असे एकूण चार जण या अपघातात ठार झाले असून
अपघाताची खबर मिळताच सुपा पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले .
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम