अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- सध्या चोरटे काय चोरतील याचा नेम नाही. नुकतीच पोलीस वसाहतीच्या संरक्षक भिंतीलाच भगदाड पाडून वसाहतीच्या प्रांगणात ठेवलेल्या विविध वाहनांच्या सुट्या भाग लंपास केले आहेत.
ही घटना संगमनेर येथे घडली. याबाबत सविस्तर असे की, संगमनेर शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस वसाहत असून या ठिकाणी पोलीस वास्तव्यास आहेत .
सध्या या वसाहतीची दुरवस्था झाल्याने घुलेवाडी येथे नवीन पोलीस वसाहत बांधण्यात आली आहे. असे असले तरी या पोलीस वसाहतीमध्ये अनेक पोलीस राहतात.
या पोलीस वसाहतीच्या आवारात विविध गुन्ह्यातील वाहने लावलेली आहेत. वर्षानुवर्ष ही वाहने या जागेवर पडून असल्यामुळे याचा गैरफायदा काही चोरटे घेत आहेत.
या वसाहतींमधील वाहनांचे स्पेअर पार्ट चोरी झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. मात्र, चोरट्यांनी आता कमालच केली आहे.
भंगार चोरी करणाऱ्या चोरट्यांनी या वसाहतीची भिंत पाडून येण्या-जाण्यासाठी रस्ता तयार केला आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेली विविध चोरीतील मोटरसायकली, कार, टेम्पो, ट्रक या गाड्या या वसाहतीच्या आवारात आणून लावल्या जातात.
मात्र, या ठिकाणी कोणताही पोलीस बंदोबस्त नसल्याने काही चोरटे रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत आहेत . पोलिसांच्या ताब्यात असलेल्या विविध गुन्ह्यातील वाहनांचे स्पेअर पार्टची सर्रास चोरी केल्या जात आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम