अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- जमिनीच्या वादातून चक्क एका महिलेच्या अंगावर डिझेल ओतून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना पाथर्डी तालुक्यातील येळी येथे घडली आहे. वंदना पांडुरंग पारगरे असे या घटनेतील पीडित महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, पिडीत पारगरे ही महिला तीच्या कुटुंबियासमवेत आई-वडिलांकडे राहते.
आई-वडिलांनी पीडित महिलेच्या नावावर जमिन केली. याचा राग मनात धरत तसेच घराच्या मागील पावसाचे पाणी आरोपीच्या शेतातून काढून दिल्याने याचा राग अनावर झाला व भगवान नाथा बडे,
अक्षय भगवान बडे व अनिकेत भगवान बडे (सर्व रा. येळी) या तिघांनी फिर्यादी पीडित महिलेच्या अंगावर डिझेल ओतून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी वरील तिघे आरोपी अटक केली आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम