अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- संपूर्ण देशात प्रसिद्धअसलेल्या साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यावरच गुन्हा दाखल करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश हे साई मंदिरात उपस्थित असल्याचे फोटो काही दिवसांपूर्वी सोशल माध्यमात व्हायरल केले म्हणून संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांना अटक करण्यात आल्याची घटना घडली आहे.
राजेंद्र जगताप यांच्यासह पाच जणांना अटक झाली आहे साईबाबा मंदिर व परिसरात सध्या कोरोनामुळे साईभक्तांना बंदी आहे, तसेच साई मंदिराची सुरक्षा लक्षात घेऊन शिर्डीतील साई मंदिरातील कोणाचेही फोटो किंवा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल करणे हे गुन्हा आहे, तसा साई संस्थान ने नियमच केला होता.
शासनानेही यासंदर्भात संस्थांनला सूचना केल्या होत्या. मात्र, या नियमाचा भंग करत संस्थान प्रशासनाने व त्यांच्या अधिकाऱ्यांनी साई मंदिरात संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश आणि समितीचे सदस्य धर्मदाय आयुक्त अहमदनगर हे उपस्थित असल्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते.
हे फोटो व्हायरल झाल्यामुळे प्रधान जिल्हा न्यायाधीश तसा धर्मादाय आयुक्त यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता, तशी तक्रारही सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केली होती.
या तक्रारीनंतर साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांच्यासह अजित जगताप, विनोद कोते, राहुल फुंदे, सचिन गव्हाणे आणि चेतक साबळे या सर्वांवर मंदिर सुरक्षा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम