अरे अरे..!देवीच्या दर्शनासाठी जाणारे दोन चिमूकले नदीत बुडाले एकाला वाचवले मात्र एकाच दुर्दैवी मृत्यू

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथील देवीच्या दर्शनासाठी नदीतून जाणारे दोन भावंडे पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात वाहून गेले. त्यापैकी एकाला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. दुसरा भाऊ प्रदीप सुभाष डाके (वय १४) वर्षे रा. सुसरे हा हाण्यात बुडून मृत्यू पावला.

बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्यादरम्यान ही घटना घडली. पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सुसरे येथील प्रदीप सुभाष डाके व आदित्य सुभाष डाके हे दोन भाऊ देवीच्या मंदिराकडे जात होते. नदी ओलांडताना पाण्याचा अंदाज आला नाही, त्यावेळी आदित्य व प्रदीप पाण्यात वाहून गेले.

जवळच कपडे धुणाऱ्या महिलांनी आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. गावातील केशव बर्डे यांनी नदीच्या पाण्यात उडी घेऊन आदित्य सुभाष डाके याला पाण्याच्या बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचविला.

मात्र, प्रदीप सुभाष डाके हा बुडालेल्या ठिकाणापासून तिनशे ते चारशे फूट अंतरावर पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्याला पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या दु:खद घटनेमुळे सुसरे गावावर शोककळा पसरली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe