HDFC Bank Launch New Service : अरे व्वा! आता इंटरनेट नसेल तरीही करता येणार पेमेंट, कसे ते जाणून घ्या

Published on -

HDFC Bank Launch New Service : एचडीएफसी बँक ही देशातील खाजगी क्षेत्रातील मोठी बँक आहे. या बँकेचे लाखो ग्राहक आहेत. आपल्या ग्राहकांसाठी बँक सतत नवनवीन सेवा सुरु करत असते. जर तुम्ही या बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी बँकेने आता एक सेवा सुरु केली आहे.

बँकेच्या या निर्णयामुळे तुम्ही आता इंटरनेट नसेल तरीही पेमेंट करू शकता. RBI च्या नियामक सँडबॉक्स कार्यक्रमांतर्गत या बँकेने Crunchfish सह भागीदारीत ऑफलाइनपे सोल्यूशन सादर केले आहे. याचा HDFC च्या ग्राहकांना खूप मोठा फायदा होणार आहे.

ग्राहकांना आता पेमेंट पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी मोबाइल नेटवर्क गरजेचे नाही. ही देशातील पहिली बँक आहे जिने असा पर्याय सुरू केला आहे, बँकेच्या या निर्णयामुळे आता ग्रामीण शहरे आणि खराब मोबाइल नेटवर्क कव्हरेज असलेल्या भागात डिजिटल पेमेंट करता येईल.

होणार मोठा फायदा

ऑफलाइन पेमेंट सोल्यूशन मोठ्या सार्वजनिक कार्यक्रम, व्यापार मेळे आणि प्रदर्शनांमध्ये कॅशलेस व्यवहारांसाठी खूप फायद्याचे आहे. सामान्यत: डिजिटल पेमेंट पद्धतींसाठी व्यवहारात सहभागी असलेल्या पक्षांपैकी एक ऑनलाइन असणे गरजेचे आहे. तसेच, एचडीएफसी बँकेचे ‘ऑफलाइनपे’ नावाचे समाधान व्यापारी आणि ग्राहक दोघांनाही इंटरनेट कनेक्शन नसेल तर व्यवहार करता येईल.

किती असणार ऑफलाइन पेमेंट ?

या सोल्यूशनमुळे व्यापाऱ्यांना ऑफलाइन मोडमध्ये पेमेंट कन्फर्मेशन मिळेल. भारतातील 16 पेक्षा शहरे आणि गावांमध्ये चार महिन्यांच्या प्रायोगिक टप्प्यात आमंत्रण लिंकद्वारे ही सेवा इतर बँकांच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असणार आहे. पायलट दरम्यान, ऑफलाइनपेसाठी व्यवहाराची रक्कम प्रति व्यवहार 200 रुपयांपर्यंत मर्यादित असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!