Petrol-Diesel Price Today: तेल कंपन्यांनी केले पेट्रल आणि डिझेलचे दर अपडेट, जाणून घ्या तुमच्या शहरातील किमती काय आहेत……

Petrol-Diesel Price Today: सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-diesel rates) अपडेट केले. आजही तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पोर्ट ब्लेअरमध्ये (Port Blair) सर्वात स्वस्त तेल उपलब्ध आहे. येथे एक लिटर पेट्रोलची किंमत 84.10 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 79.74 रुपये आहे.

IOCL च्या अपडेटनुसार देशातील इतर राज्यांमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. राष्ट्रीय राजधानी दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर येथे पेट्रोल 96.72 रुपये, डिझेल 89.62 रुपयांना विकले जात आहे. मुंबईत (Mumbai) एक लिटर पेट्रोलची किंमत 111.35 रुपये आहे, तर एक लिटर डिझेल 97.28 रुपयांना विकले जात आहे.

चेन्नईबद्दल बोलायचे झाले तर इथेही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. येथे एक लिटर पेट्रोल 102.63 रुपये, डिझेल 94.24 रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपयांना विकले जात आहे. लखनऊ, यूपीमध्ये पेट्रोल 96.57 रुपये, डिझेल 89.76 रुपयांना विकले जात आहे.

जाणून घ्या इतर शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर….

  • पटणामध्ये पेट्रोल 107.24 रुपये, डिझेल 94.04 रुपये आहे.
  • राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 113.65 रुपये आणि डिझेल 98.39 रुपयांना उपलब्ध आहे.
  • जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये, डिझेल 93.72 रुपयांना विकले जात आहे.
  • गुरुग्राममध्ये पेट्रोल 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपयांना विकले जात आहे.

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा –

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात –

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या आधारावर तेल विपणन कंपन्या (Oil marketing companies) दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe