Old Notes and Coin : अनेकांना जुन्या नोटा आणि नाणी जमा करण्याची आवड असते. जर तुम्हालाही अशी आवड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुमची हीच आवड तुम्हाला लखपती बनवू शकते.
कारण अशा दुर्मिळ वस्तूंना मार्केटमध्ये खूप मागणी असते. अशा दुर्मिळ नाणी आणि नोटांची तुम्हाला इबे, क्विकर किंवा कॉइनबाजार यांसारख्या वेबसाइटवर विक्री करता येत आहे. याच वेबसाइटवर सध्या रुपयांचे दुर्मिळ नाणे विकले जात आहे. जर तुमच्याकडेही असे नाणे असेल तर तुम्हीही लाखो रुपये कमावू शकता.
अशा काही ऑनलाइन पोर्टल्स आहेत ज्या ठिकाणी जुन्या नोटांची खरेदी आणि विक्री केली जात आहे. या ठिकाणी काही खास प्रकारच्या नोटा आणि नाण्यांची विक्री करण्यात येत असून अनेकजण या विशेष प्रकारच्या नोटा आणि नाण्यांसाठी लाखो रुपये मोजायला तयार आहेत.
खरं तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अशा खास नोटा आणि नाण्यांना मोठी मागणी असून या ठिकाणी नोटा आणि नाण्यांचा मोठ्या प्रमाणावर लिलाव होत असून अनेकजण या लिलावात सहभागी होत आहेत.
तसेच आता तुम्हालाही पैसे हवे असतील तर तुम्ही तुमच्याकडे असणारी जुनी नाणी तपासून पहा. जर तुमच्याकडे 2004 पूर्वी जारी करण्यात आलेले 5 रुपयांचे नाणे असेल तर, तुम्हाला लाखो रुपये मिळू शकतील. या 5 रुपयांच्या नाण्याला खूप मागणी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नसून हे नाणे तुम्ही घरबसल्या विकू शकता.
अशी करा विक्री
यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला इबे, क्विकर किंवा कॉइनबाजार सारख्या लिलावाच्या वेबसाइटवर जावे लागणार आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचे स्वतःचे विक्रेता खाते तयार करावे लागणार आहे. तुम्ही विक्रेता खाते तयार केल्यानंतर, या नाण्यांच्या दोन्ही बाजूंचा फोटो अपलोड करावा लागणार आहे. ज्याला हे नाणे विकत घ्यायचे असेल तो तो व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल.