Baba Ramdev : योगगुरू बाबा रामदेव उद्या, 16 सप्टेंबरला म्हणजे शुक्रवारी पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते पतंजली ग्रुपच्या 5 कंपन्यांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) योजनेची तपशीलवार माहिती देणार आहेत.
योगगुरू रामदेव यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले होते की, पतंजली आयुर्वेद (Patanjali Ayurved), पतंजली वेलनेस (Patanjali Wellness) आणि पतंजली मेडिसिन (Patanjali Medicine) याशिवाय पतंजली लाइफस्टाइलचा (Patanjali Lifestyle) आयपीओ लॉन्च करण्याची योजना आहे. रामदेव यांच्या योजनेनुसार या कंपन्या पुढील 5 वर्षात शेअर बाजारात लिस्टिंग होणार आहे.

शेअर बाजारात लिस्टेड एकमेव कंपनी
तुम्हाला सांगतो की, रामदेव यांची एकमेव कंपनी पतंजली फूड्स शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाली आहे. मात्र, या कंपनीचा आयपीओ रामदेव यांच्या नेतृत्वाखाली आला नाही.
काही महिन्यांपूर्वी, रुची सोया म्हणून सूचीबद्ध असलेली ही कंपनी पतंजली आयुर्वेदने 2019 मध्ये 4,350 कोटी रुपयांना एका ठराव प्रक्रियेअंतर्गत विकत घेतली होती. ही कंपनी आधीच स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाली होती.
हाही अजेंडा
पतंजलीविरोधात अफवा पसरवणाऱ्यांचा पर्दाफाश करणे हाही पत्रकार परिषदेचा अजेंडा आहे. यासोबतच रामदेव पतंजली ग्रुपच्या व्हिजन आणि मिशन 2027 ची रूपरेषा सांगतील.
त्याचबरोबर, भारताला स्वावलंबी बनवण्यात पतंजली ग्रुपच्या योगदानासाठी पुढील 5 वर्षांसाठी आम्ही 5 प्रमुख प्राधान्यक्रम आणि उद्दिष्टे सांगू.