यूपीत उतरविले एक लाख भोंगे, योगींनी थोपटली सरकारची पाठ, राज यांचा उल्लेख टाळला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 04 मे 2022 Maharashtra news : महाराष्ट्रात मशिदीवरील भोंगे उतरविण्यावरून वादप्रतिवाद सुरू असताना तिकडे उत्तर प्रदेशात आतापर्यंत सुमारे एक लाख प्रार्थना स्थळांवरील भोंगे उतरविण्यात आले आहेत.

याशिवाय रस्त्यावर नमाज पठण करणेही पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्य सरकार आणि पोलिसांची पाठ थोपटली आहे.

याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूर्वीच योगी यांचे जाहीर कौतूक केले आहे. मात्र, योगी यांच्याकडून यासंबंधी राज यांचा उल्लेख टाळण्यात येत असल्याचे दिसून येते.

आमची कारवाई पूर्वीपासूनच सुरू असल्याचे ते आवर्जून सांगत असल्याचेही दिसून येते. योगी यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेशमध्ये आत्तापर्यंत सुमारे एक लाख लाउडस्पीकर खाली उतरवले आहेत.

त्यामुळे राज्यात लाउडस्पीकरमुळे होणारा गोंगाट कमी झाला आहे. आमच्या सरकारने हा मुद्दा चांगला हाताळला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाऊडस्पीकर काढल्यामुळे आता संपूर्ण उत्तर प्रदेशातील आवाज कमी झाला आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लाऊडस्पीकर काढताना कुठेही वाद झालेला नाही. उत्तर प्रदेशातील पोलीस सातत्याने लाऊडस्पीकर विरोधात मोहीम राबवत आहेत.

आम्ही केवळ लाऊडस्पीकरचा प्रश्न सोडवला नाही, तर रस्त्यावरील नमाजाचा प्रश्नही सोडवला आहे. रस्त्यावर नमाज अदा करु नये, अशा सक्त सूचना आम्ही दिल्या होत्या.

आता रस्त्यावर कोणीही नमाज अदा करत नाही. यूपीमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या २५ कोटींच्या आसपास आहे. काल झालेल्या ईदसाठीही कुठेही रस्त्यावर नमाज अदा केल्याचे वृत्त नाही.

लोक स्वतःही पुढे येऊन रस्त्यांऐवजी घरांमध्ये किंवा मशिदींमध्ये नमाज अदा करुन या नव्या आदेशाचे पालन करत असल्याचे योगी यांनी सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News