अ‍ॅप्पलच्या एका फिचर्समुळे फेसबुकला 10 अब्ज डॉलरचं नुकसान

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- फेसबूक, व्हॉट्स अ‍ॅप आणि इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया कंपनीची मूळ कंपनी Meta Platforms Inc ने अ‍ॅप्पलमुळे दहा अब्ज डॉलरचं नुकसान झाल्याचं सांगितलं.

अ‍ॅप्पलच्या प्रायव्हसी बदलामुळे मोठं नुकसान सहन करावे लागले. iOS च्या प्रायव्हसी बदलावामुळे फेसबूक कंपनीला दहा अब्ज डॉलर रुपयाचं नुकसान झालेय. iOS च्या बदलामुळे यावर्षी कंपनीच्या व्यावसायावर मोठा परिणाम झालाय.

मेटाचं म्हणणं आहे की, वर्षातील पहिल्या तिमाहीत त्यांची कामगिरी अंदाजापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. अ‍ॅपलने त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टमची गोपनीयता बदलली आहे.

त्यामुळे ब्रँड्सना Facebook आणि Instagram वर जाहिरात करणे कठीण होत आहे. यासोबतच पुरवठा साखळीतील आव्हानांमुळे कंपनीच्या अडचणीही वाढल्या आहेत.

याचा थेट परिणाम कंपनीकडून मिळणाऱ्या जाहिरातींवरही होणार आहे. ट्रेडिंगच्या काही तासांमध्ये कंपनीच्या शेअर्सच्या किंमती 22 टक्क्यांनी घसरल्या आहेत.

2021 च्या शेवटच्या 2 तिमाहीत फेसबुक अ‍ॅपने जवळपास 10 लाख दररोजचे यूजर्स गमावले. तथापि, अ‍ॅपचे अद्याप 2 अब्ज दररोज वापरकर्ते आहेत.

कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) डेव्हिड वेनर म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीमुळे जगभरातील यूजर्स कमी झाले आहेत. यामध्ये आशिया-पॅसिफिक प्रदेशातील कोरोना महामारी आणि भारतातील मोबाइल डेटाच्या किमतीत झालेली वाढ यांचा समावेश आहे. या कारणांमुळे स्पर्धा सेवांच्या वाढीवर नकारात्मक परिणाम झाला आहे.

त्यामुळे विशेषत: तरुणांचा वापर कमी झाला आहे. दरम्यान, नुकत्याच जाहीर झालेल्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील मार्क झुकरबर्ग यांचे स्थान खाली घसलले आहे.

झुकरबर्ग यांच्या संपत्तीत जवळपास 12 टक्क्यांनी घट झाली आहे. वॉरन बफेट यांनी संपत्तीच्या बाबतीत मार्क झुकरबर्ग यांना पुन्हा एकदा मागे टाकले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe