OnePlus 11R : वनप्लस (OnePlus) चाहत्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. लाँच अगोदरच OnePlus 11R चे स्पेसिफिकेशन्स (OnePlus 11R Specifications) ऑनलाईन लीक झाले आहेत.
OnePlus लवकरच आपला नवीन स्मार्टफोन OnePlus 11R भारतात लाँच (OnePlus 11R Launch in India) करणार आहे, परंतु, त्याअगोदर या फोनचे (OnePlus 11R smartphone) स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत.
कंपनी फोनमध्ये (OnePlus Smartphone) Snapdragon 8+ Gen 1 SoC चिपसेट देऊ शकते, जे 16GB पर्यंत रॅम आणि कमाल 256GB स्टोरेजसह जोडले जाऊ शकते. Tipster Steve H McFly ने MySmartPrice च्या सहकार्याने कथित OnePlus 11R चे संपूर्ण तपशील लीक केले आहेत.
OnePlus 11R चे स्पेसिफिकेशन्स
OnePlus 10R मध्ये 6.7-इंचाचा फुल HD + AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. त्याचा रिफ्रेश दर 120Hz असेल. OnePlus कडून येणारा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 SoC द्वारे समर्थित असू शकतो. लीकनुसार, OnePlus 11R 8GB + 128GB आणि 16GB + 256GB वेरिएंटमध्ये ऑफर केला जाऊ शकतो.
ट्रिपल रियर कॅमेरा
फोटोग्राफीसाठी, स्मार्टफोनला ट्रिपल रियर कॅमेरा युनिट मिळू शकतो, ज्यामध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 2MP मॅक्रो शूटरचा समावेश आहे. सेल्फीसाठी, समोर 16MP सेन्सर असू शकतो.
5,000mAh ची शक्तिशाली बॅटरी
याशिवाय, 100W SuperVOOC चार्जिंग स्पीड सपोर्टसह आगामी डिव्हाइसमध्ये 5,000mAh ची शक्तिशाली बॅटरी मिळू शकते. फोन 2.5 वक्र कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षणासह येईल.
OnePlus 10R चे स्पेसिफिकेशन्स
OnePlus 10R मध्ये 6.7-इंचाचा फुल HD + AMOLED डिस्प्ले देखील उपलब्ध आहे. त्याचा रिफ्रेश दर 120 Hz आहे. फोन 2.5 वक्र कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षणासह येतो. फोनला MediaTek Dimensity 8100 Max SoC मिळतो, जो 12GB पर्यंत LPDDR5 RAM सह जोडलेला आहे.
OnePlus 10R Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित OxygenOS 12.1 वर चालतो. या फोनमध्येही कंपनी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देत आहे.