Oneplus 43 inch Smart TV : भारतीय बाजारात अनेक स्मार्ट टीव्ही लाँच होत असतात. त्यातील काही स्मार्ट टीव्हीच्या किमती खूप जास्त असतात तर काही स्मार्ट टीव्हीच्या किमती खूप कमी असतात. Oneplus ही खूप लोकप्रिय कंपनी आहे.
आता तुम्ही या कंपनीचा महागडा स्मार्ट टीव्ही खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. कंपनीच्या 43 इंच स्मार्ट टीव्हीवर आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत मिळत आहे. Amazon वर तुम्ही स्वस्तात कंपनीचा टीव्ही खरेदी करू शकता.
OnePlus 43 इंच स्मार्ट टीव्हीवर मिळेल शानदार सवलत
किमतीचा विचार केला तर OnePlus TV Y1S 32-इंच टीव्हीची मूळ किंमत रुपये 31999 इतकी आहे. परंतु यावर अॅमेझॉन सवलत देत आहे. 31% च्या सवलतीनंतर तुम्ही ते 21,999 रुपयांना खरेदी करू शकता. समजा जर तुम्ही तुमचा जुना टीव्ही बदलून नवीन टीव्ही खरेदी केल्यास तुम्हाला 2,540 रुपयांपर्यंत सवलत मिळेल.
जाणून घ्या खासियत
या स्मार्टटीव्हीमध्ये 43-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, जो फुल एचडी प्लस (1920×1080) रिझोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच या टीव्हीमध्ये बेझल-लेस डिझाइन आणि एलईडी पॅनेल पाहायला मिळेल. आणि ते HDR 10 ला समर्थन देतो. हे लक्षात घ्या की कंपनीचा हा Android TV असून तो Android TV 11 OS वर काम करतो. यामध्ये वनप्लस कनेक्ट इकोसिस्टम, क्रोमकास्ट, गुगल असिस्टंट, मिराकास्ट यांसारखी फीचर्स पाहायला मिळतील.
हा स्मार्टटीव्ही Netflix, YouTube, Prime Video, Hungama, Hotstar, Sony Liv तसेच Jio Cinema, Zee5, Eros Now सारख्या अॅपला सपोर्ट करतो. तर यात कनेक्टिव्हिटीसाठी, दोन एचडीएमआय पोर्ट, दोन यूएसबी पोर्ट आणि ड्युअल बँड वाय-फाय मिळेल. टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ आणि डॉल्बी अॅटमॉससह 20W साउंड देण्यात आला आहे.