OnePlus TV : भारतीय बाजारात सध्या स्मार्टटीव्हीची क्रेझ तयार झाली असून अनेक कंपन्या स्मार्टटीव्ही लाँच करत आहेत. त्यामुळे कोणता टीव्ही चांगला असा प्रश्न अनेकांना पडत आहे.
जर तुम्हालाही प्रश्न पडला असेल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा कारण नुकताच वनप्लसने आपला नवीन नवीन 4K Android TV लाँच केला आहे. यामध्ये कंपनीने उत्तम फीचर्स दिले आहेत.
येथून करा खरेदी
ग्राहकांसाठी कंपनीच्या वेबसाइटशिवाय, हा टीव्ही Amazon, Flipkart, OnePlus Experience Stores आणि सर्व प्रमुख ऑफलाइन पार्टनर स्टोअर्सवरून विकला जाणार आहे.
ऑफर
भारतात या टीव्हीची किंमत 39,999 रुपये ठेवली असून विक्री 13 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. लॉन्च ऑफर म्हणून या स्मार्ट टीव्हीवर बँक सवलत ग्राहकांना मिळणार आहे.
ICICI बँक कार्ड असलेल्या ग्राहकांना या टीव्हीवर एकूण 3,000 रुपयांची बँक सूट दिली जाईल. परंतु, हे लक्षात घ्या की ही ऑफर 25 डिसेंबरपर्यंतच वैध आहे. याशिवाय, कंपनी सर्व प्रमुख बँक व्यवहारांवर 9 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI पर्याय ग्राहकांना देत आहे.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
ग्राहकांना या टीव्हीमध्ये 10-बिट कलर डेप्थसह 4K UHD डिस्प्ले मिळत असून हा HDR10+, HDR10 आणि HLG ला देखील सपोर्ट करतो. पिक्चर क्वालिटी चांगली मिळेल असा दावा कंपनीने केला आहे.
यामध्ये एक प्रगत गामा इंजिन आहे जे डायनॅमिक कॉन्ट्रास्ट आणि दोलायमान रंगासह अल्ट्रा-क्लीअर सामग्री वितरीत करण्यासाठी व्हिज्युअलला हुशारीने ट्यून करते. त्याशिवाय यामध्ये एक एमईएमसी तंत्रज्ञानही देण्यात आले आहे. हे गुळगुळीत आणि वास्तववादी हालचाल प्रदान करते.