वनप्लसने आपला पहिला फोल्डेबल फोन OnePlus Open लाँच केला आहे. याच्या 16 जीबी/512 जीबी व्हेरियंटची किंमत भारतात 1,39,999 रुपये आहे. या नव्या फोनची विक्री 27 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
प्री-ऑर्डर सुरू करण्यात आली आहे. सध्या ग्राहकांना फोन खरेदीवर 14000 रुपयांपर्यंत बचत करता येईल. वनप्लसचा हा लेटेस्ट फोन व्हॉयेजर ब्लॅक आणि एमराल्ड डेस्क या दोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
Samsung Galaxy Z Fold 5 पेक्षा कमी आहे किंमत – वनप्लसचा हा फोल्डेबल फोन सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 5 फोल्डिंग फोनपेक्षा कमी किंमतीत येतो. भारतात सॅमसंगच्या या हँडसेटची किंमत 1,54,999 रुपयांपासून सुरू होते. वनप्लसचा हा लेटेस्ट फोल्डेबल फोन जवळपास 15,000 रुपयांनी स्वस्त आहे. सध्या 14,000 रुपयांपर्यंतच्या प्री-ऑर्डर बोनसमुळे वनप्लस ओपन अधिक स्वस्त होत आहे.
OnePlus Open : उपलब्धता आणि डिस्काउंट वनप्लस ओपन 16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेजसह सिंगल व्हेरिएंटमध्ये येतो. नव्या हँडसेटची प्री-ऑर्डर सुरू झाली आहे. खरेदीदार कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन ऑर्डर करू शकतात.
वनप्लस ओपनची विक्री 27 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार आहे. एक्सचेंज बोनस अंतर्गत तुम्ही या डिव्हाइसवर 8000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. याशिवाय आयसीआयसीआय बँक आणि वनकार्डधारकांना 5,000 रुपयांपर्यंत इन्स्टंट बँक डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. वनप्लस युजर्संना अतिरिक्त बोनसअंतर्गत 1000 रुपयांपर्यंत ची बचत करता येईल. अधिकृत वेबसाइटनुसार, 31 ऑक्टोबरपासून फोनचे वितरण केले जाईल.
OnePlus Open चे स्पेसिफिकेशन- या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह 16 जीबी LPDDR5X रॅम आणि 512 जीबी यूएफएस 4.0 स्टोरेज आहे. या फोनमध्ये 4808 mAhची दमदार बॅटरी आहे जी 67 वॉट फास्ट चार्जरला सपोर्ट करते.
कंपनीचा दावा आहे की, फोन 1 ते 100 टक्के चार्ज करण्यासाठी फक्त 42 मिनिटे लागतात. वनप्लस ओपन 5जी तंत्रज्ञानाला सपोर्ट करतो.
वनप्लस ओपन फोल्डेबल फोनचा डिस्प्ले फोल्ड केल्यावर 6.31 इंचाचा असतो, उघडल्यानंतर तो 7.82 इंच होतो, त्याचा रिफ्रेश रेट 120HZ, LTPO 3.0, 10 bit color असतो.
तसेच फोनची पीक ब्राइटनेस 2800 निट्स आहे. वनप्लस ओपन फोल्डेबल फोनमध्ये ऑक्सिजन ओएस आहे, जो आपल्याला मल्टी-टास्किंग देतो. तसेच फोनमध्ये एकाच वेळी दोन टॅब उघडू शकता. तसेच गेमिंगच्या दृष्टीनेही हा फोन चांगला आहे.