5G Smartphone Offers : स्वस्तात मिळतोय OnePlus चा ‘हा’ स्मार्टफोन, जाणून घ्या ऑफर

Ahmednagarlive24 office
Published:

5G Smartphone Offers : जर तुम्ही स्वस्तात जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन असणाऱ्या स्मार्टफोनच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण OnePlus चा लोकप्रिय असणारा स्मार्टफोन खूप कमी किमतीत खरेदी करू शकतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा हा 5G स्मार्टफोन आहे. तुम्ही आता स्वस्तात OnePlus Nord CE 2 Lite हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. अशी जबरदस्त ऑफर Amazon वर मिळत आहे. हे लक्षात घ्या की अशी ऑफर काही दिवसासाठीच असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा फोन विकत घ्या.

मिळत आहे चांगली सवलत

OnePlus चा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणारा Nord 2 Lite 5G स्मार्टफोन 19,999 रुपयांच्या Amazon सेलमध्ये लिस्ट केला आहे. तसेच तुम्हाला जुन्या किंवा सध्याच्या फोनसाठी 18,050 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळू शकते. जर तुमच्या जुन्या फोनची स्थिती चांगली असेल तर तुम्हाला या ऑफरचा पूर्ण फायदा दिला जाईल. तसेच हे लक्षात घ्या की यावर तुम्हाला बँक ऑफर दिली जात नाही. तुम्ही एक्सचेंज ऑफर समाविष्ट करून त्याची किंमत कमी करू शकता.

असे आहे फिचर्स आणि प्रोसेसर

कंपनीने या फोनमध्ये 6.59-इंचाचा फुल-एचडी प्लस स्क्रीन डिस्प्ले दिला आहे. त्यात ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट मिळू शकते, त्यामुळे हा फोन सुरळीत चालतो. आपल्या ग्राहकांसाठी कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 64-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 2-मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ लेन्स कॅमेरा दिला आहे.

स्टोरेजचा विचार केला तर यात 128GB पर्यंत स्टोरेज आणि 6GB पर्यंत रॅम स्टोरेज दिले आहे. 5000mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. जे 33W फास्ट चार्जिंग सपोर्टमध्ये उपलब्ध करून दिले आहे.

अशी आहे ऑफर

तुम्ही 48999 रुपयांचा OnePlus 10R 5G फोन 32,999 मध्ये खरेदी करू शकता. जर तुम्हाला हा फोन घ्यायचा असेल तर बँक ऑफरद्वारे तुम्ही यावर सूट मिळवू शकता. इतकेच नाही तर एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येत आहे. यात 50 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळेल. तसेच, फोन चार्ज करण्यासाठी 5000 mAh बॅटरी उपलब्ध आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe