अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- नगर अर्बन बँकेच्या 14 जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 55 हजार 991 मतदारांपैकी 17 हजार 721 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. झालेल्या मतदानाची टक्केवारी ही अवघी 31.65 टक्के आहे.
दरम्यान उद्या (मंगळवारी) सकाळी मतमोजणी होणार आहे. नगर अर्बन बँकेच्या 14 जागांसाठी रविवारी सकाळी 9 ते सांयकाळी पाच यावेळेत शांततेत मतदान प्रक्रिया सुरू झाली.
नगरमधील भाऊसाहेब फिरोदिया शाळेतील मतदान केंद्रावर राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप, दिवंगत नेते तथा बँकेचे माजी चेअमन दिलीप गांधी यांच्या पत्नी सरोज गांधी यांनी मतदानाचा हक्क बजावला.
नगर अर्बन बँकेच्या 18 संचालकांच्या जागांपैकी आधीच सत्ताधारी दिलीप गांधी गटाने चार जागा बिनविरोध काढलेल्या आहेत. उर्वरित 14 जागांसाठी 21 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
दरम्यान, कमी झालेले मतदान हे सत्ताधार्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याचे आजपर्यंत निवडणुकीतील चित्र असल्याने बँकेवर दिवंगत दिलीप गांधी गटाचा वर्चस्व राहणार असल्याची चर्चा आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार असून दिवसभरात निकाल हाती येणार आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम