नाशिक : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) सतत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) नेत्यांवर टीका करताना दिसतात. तर मध्यंतरी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि किरीट सोमय्या यांच्यामध्ये चांगलाच आरोप सत्राचा वाद रंगला होता. आता पुन्हा एकदा सोमय्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, आमदारांचा (MLA) घोडेबाजार महाराष्ट्रात सुरू आहे. तर सामनाचे संपादक आणि पोलीस महासंचालक यांना विनंती आहे, की त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून माहिती घेऊन बाजार मांडणाऱ्यांवर कारवाई करावी.

निवडणुकीत भ्रष्टाचार होत असेल तर तो गुन्हा आहे. मात्र अशाप्रकारे आमदारांना घोडे म्हणण्याचे काम गाढवच करू शकतात, अशी घणाघाती टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे.
किरीट सोमय्यांनी घोडेबाजारावरून लक्ष्य करत म्हटले, की मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे, की त्यांच्या वर्तमानपत्रात आलेली माहिती त्यांनी निवडणूक आयोग, पोलीस यांना द्यावी.
मुख्यमंत्र्यांचे स्टेटमेंट घ्यावे, सामनाच्या संपादकांचे स्टेटमेंट घ्यावे आणि कारवाई करावी, असे आव्हान त्यांनी दिले आहे. पुढे ते म्हणाले, की बेईमान कोण सेनेचे आमदार, त्यांना समर्थन देणारे आमदार की नेते बेईमान, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले, सचिन वाझेला सीबीआयने माफीचा साक्षिदार होण्यास मंजुरी दिली आहे.
सचिन वाझे बोलू लागले तर उद्धव ठाकरेंना भीती वाटते ‘मेरा क्या होगा?’ तेरा क्या होगा कालिया? जर वाझेंनी सांगितले, की दापोलीच्या रिसॉर्टचे पैसे कोणी दिले,
सचिन वाझेच्या वसुलीमधून कॉन्टॅक्टरचे पैसे दिले, असे जर वाझेंनी सांगितले तर तुमचे काय होणार उद्धव ठाकरे, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांच्यावर सोमय्यांनी निशाणा साधला आहे.
सचिन वाझे, बजरंग खरमाटे जर माफीचा साक्षिदार झाले आपल्या अडचणी वाढणार हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे. सचिन वाझेनी जर सांगितले, की माझी नियुक्ती उद्धव ठाकरेंमुळे झाली तर तुमचे काय होणार उद्धव ठाकरे असेही सोमय्या म्हणाले आहेत.