अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- एकीकडे मागील एक वर्षापासून कोरोनाचे धुमाकूळ घातल्याने अनेकांचे प्रचंड हाल झाले व अजूनही होत आहेत.
त्यातच आता मिशन बिगीन अंतर्गत प्रशासनाने काही निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे काही सेवा सुरू झाल्या आहेत.
मात्र आधीच कोरोनामुळे अनेकांच्या जवळच्या लोकांचा मृत्यू झाला असतानाच आता परत एकदा रस्ते अपघात वाढले असून, त्यात देखील अनेक बळी जात आहेत.
अशाचा एका घटनेत रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलेचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सुजाता विलास धनेश्वर असे त्या मृत महिलेचे नाव आहे.
कोपरगाव शहरातील रिद्धीसिद्धी नगर येथील रहिवासी असलेल्या धनेश्वर यांचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला असल्याची माहिती कोपरगाव येथील रेल्वेचे स्थानकप्रमुख यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठण्यात दिली असून, या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
धनेश्वर या रेल्वेने कोपरगाव येथून भुसावळला जात होत्या. खिर्डी गणेश शिवारात त्या रेल्वेतून पडल्या. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम