Oppo A38 : जर तुम्हाला ओप्पोचा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आहे. सध्या Amazonवर सेल सुरु आहे. या सेलमधून तुम्ही Oppo A38 हा सर्वात जास्त विक्री करणारा स्मार्टफोन आणखी स्वस्त खरेदी करता येईल.
या फोनची मूळ किंमत 16,999 रुपये इतकी आहे. परंतु तुम्ही Amazon च्या Great Indian Festival Sale मध्ये 24% डिस्काउंट नंतर 12,999 रुपयांना खरेदी करू शकता. या फोनवर 1,000 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट मिळेल. तसेच तुम्ही हा फोन 11,900 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनससह खरेदी करू शकता.
जाणून घ्या Oppo A38 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
कंपनीकडून Oppo A38 या स्मार्टफोनमध्ये 720×1612 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.56 इंच HD डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीच्या या फोनमध्ये देण्यात आलेला हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच त्याची शिखर ब्राइटनेस पातळी 720 nits इतकी आहे.
या स्मार्टफोनचा स्क्रीन टू बॉडी रेशो 89.90% इतका आहे. स्टोरेजचा विचार करायचा झाला तर कंपनीचा हा फोन 4 GB रॅम आणि 64 GB अंतर्गत स्टोरेज पर्यायात येतो. यात तुम्हाला MediaTek Helio G85 प्रोसेसर पाहायला मिळेल. त्याशिवाय फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी दिला आहे.
यामध्ये 50-मेगापिक्सेलच्या मुख्य कॅमेरासह 2-मेगापिक्सेल पोर्ट्रेट लेन्सचा समावेश असेल. तसेच सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच तुम्हाला फोनच्या पुढील आणि मागील कॅमेर्यांसह 30 fps वर 1080p व्हिडिओ शूट करता येईल.
इतकेच नाही तर Oppo A38 ची बॅटरी 5000mAh असेल. ही बॅटरी 33 वॅटच्या सुपरव्हूक चार्जिंगला सपोर्ट करत असून साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असणाऱ्या या फोनमध्ये ड्युअल सिम, Wi-Fi, 4G VoLTE, GPS, USB टाइप-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे कनेक्टिव्हिटी पर्याय मिळतील.