Oppo A78 5G : दिग्गज स्मार्टफोन कंपनी ओप्पो आपली A सीरीजचा स्मार्टफोन Oppo A78 5G भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे कंपनीच्या चाहत्यांना नवीन वर्षात एक आनंदाची बातमी मिळू शकते.
हा स्मार्टफोन कंपनी भारतात 16 जानेवारीला लाँच केला जाऊ शकतो, तसेच यामध्ये कंपनी जबरदस्त फीचर्स देत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा फो कमी किमतीत खरेदी करता येईल.
अपेक्षित किंमत
याबाबत काल कंपनीने ट्विट केले आहे. त्यानुसार Oppo A78 5G हा स्मार्टफोन भारतात 16 जानेवारीला लॉन्च होणार आहे. परंतु, कंपनीने अजूनही या फोनची भारतातील किंमतीबाबत कोणतीही माहिती दिली नाही. तरीही हा फोन 20 हजारांपेक्षा कमी किमतीत दिला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे.
The era of 5G has dawned upon us 🌅, and it’s time to experience superior connectivity and blazing-fast speed 🚀with #OPPOA78 #5G.
Arriving soon at super speed! pic.twitter.com/GTmJy9yuQt
— OPPO India (@OPPOIndia) January 12, 2023
फीचर्स
Oppo A78 5G च्या मलेशिया प्रकारानुसार, फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 90Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.56-इंच HD Plus (720×1,1612 pixels) LCD स्क्रीन उपलब्ध असणार आहे.
यामध्ये Mali-G57 MC2 GPU सह MediaTek Dimensity 700 प्रोसेसर उपलब्ध असणार आहे. कंपनी हा फोन 8 GB LPDDR4x रॅम आणि 128 GB UFS 2.2 स्टोरेज सह लॉन्च करणार आहे. तसेच, रॅम 8GB पर्यंत वाढवता येते.
कॅमेरा आणि बॅटरी
यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असणार आहे ज्यामध्ये प्राथमिक लेन्स 50 मेगापिक्सेल आणि दुसरी लेन्स 2 मेगापिक्सेल इतकी असणार आहे. फ्रंटमध्ये सेल्फीसाठी 8-मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध असणार आहे.
या कॅमेरा सेटअपमुळे 30fps वर फुल-एचडी व्हिडिओ रेकॉर्ड करता येईल. तसेच या फोनला 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी मिळेल. हा स्मार्टफोन एकदा पूर्ण चार्ज झाला तर तो 16 तास सतत व्हिडिओ प्ले करता येईल असा दावा कंपनीचा दावा आहे.