Oppo Find N3 Flip : आता तुम्ही Oppo चा नवीन फोल्डेबल फोन पहिल्या सेलमध्ये 20 हजार स्वस्तात खरेदी करू शकता. खरंतर Oppo ने आपला नवीन फोल्डेबल स्मार्टफोन Oppo Find N3 Flip भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. जो तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता.
हा स्मार्टफोन अगोदर चिनी मार्केटमध्ये लॉन्च केला होता कंपनीच्या या फोनच्या बॅक पॅनलवर Hasselblad ब्रँडिंग कॅमेरा सेटअप दिला आहे. हा फ्लिप फोनमध्ये उपलब्ध असलेला हा सर्वात शक्तिशाली कॅमेरा सेटअप दिला असून या कॅमेऱ्यात टेलिफोटो सेन्सरसह झूम करण्याची क्षमता उत्तम आहे.
बंपर सवलत
कंपनीचा हा नवीन फोल्डेबल फोन 22 ऑक्टोबरपासून भारतीय बाजारात खरेदी करता येऊ शकतो. या फोनची किंमत 94,999 रुपये ठेवली आहे. समजा जर तुम्ही आयसीआयसीआय बँक, एसबीआय, कोटक बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक कार्डद्वारे पेमेंट केले तर 12,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. विद्यमान Oppo वापरकर्त्यांना जुन्या फोनच्या बदल्यात 8000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल.
सर्व ऑफर्ससह ग्राहकांना हा फोन 20 हजार रुपयांना कमी किमतीत खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कंपनी एक वेळ मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट मिळेल. या ऑफरचा लाभ पहिल्या 6 महिन्यांमध्ये Find N3 फ्लिप खरेदी करणाऱ्यांना मिळणार आहे हे लक्षात ठेवा. या फोनची प्री-बुकिंग सुरू झाली असून तो तुम्हाला कंपनीच्या वेबसाइटशिवाय फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे.
जाणून घ्या खासियत
स्टोरेज आणि प्रोसेसरचा विचार केला तर Oppo च्या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 9200 प्रोसेसर आणि 12GB RAM सह 256GB स्टोरेज दिले आहे. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.8 इंचाचा LTPO डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचे वजन फक्त 198 ग्रॅम असून त्याची जाडी 7.8 मिमी आहे. IPX4 रेटिंग देते.
याच्या कॅमेरा सेटअपबद्दल सांगायचे झाले तर फोनच्या मागील पॅनलवर OIS सह 50MP प्राइमरी वाइड लेन्स दिली आहे. सेटअपमध्ये 32MP टेलिफोटो सेन्सर आणि 48MP अल्ट्रावाइड सेन्सर यांचा समावेश केला आहे. हे Android 13 वर आधारित ColorOS 13 सह येते. बाहेरील बाजूस 3.26-इंच वर्टिकल कव्हर डिस्प्ले पाहायला मिळेल. या फोनच्या 4300mAh बॅटरीला 44W चार्जिंग सपोर्ट मिळतो.