Oppo Reno 8 Sale Today: ओप्पोने नुकतेच भारतात ओप्पो रेनो 8 (oppo reno 8) सिरीजचे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. या मालिकेत Oppo Reno8 5G आणि ओप्पो रेनो 8 प्रो 5G (Oppo Reno 8 Pro 5G) लाँच करण्यात आले होते. Oppo Reno8 Pro 5G 19 जुलै रोजी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला होता. आता Oppo Reno8 5G आज विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल.
ओप्पोने (oppo) आधीच पुष्टी केली आहे की हा फोन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टद्वारे (flipkart) भारतात उपलब्ध करून दिला जाईल. याशिवाय कंपनी हा स्मार्टफोन ओप्पो स्टोअर आणि मेनलाइन रिटेल स्टोअरद्वारे (Mainline Retail Stores) विकणार आहे.

Oppo Reno8 ची किंमत –
Oppo Reno8 एकाच 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. त्याची किंमत 29,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे शिमर गोल्ड आणि शिमर ब्लॅक कलर पर्यायांमध्ये विकले जाईल. कंपनी ICICI बँक, SBI, कोटक बँक, बँक ऑफ बडोदा क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे (credit and debit cards) 3000 रुपयांपर्यंत सूट देत आहे.
याशिवाय, वापरकर्त्यांना डिव्हाइसच्या खरेदीवर मोफत पिक अँड ड्रॉप, 24/7 हॉटलाइन सपोर्ट आणि मोफत स्क्रीन गार्ड आणि बॅक कव्हर दिले जात आहे. याशिवाय वापरकर्त्यांना ICICI, SBI आणि कोटक बँकेच्या नॉन-ईएमआय व्यवहारांवर 1200 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.
Oppo Reno 8 5G चे स्पेसिफिकेशन्स –
Oppo Reno 8 5G मध्ये 6.43-इंच AMOLED स्क्रीन आहे. त्याचा स्क्रीन रिफ्रेश दर 90Hz आहे आणि त्याला गोरिल्ला ग्लास 5 संरक्षण आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 3100 चिपसेट देण्यात आला आहे.
हा फोन Android 12-आधारित ColorOS 12.1 मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 50-मेगापिक्सेल आहे.
यात 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. यात 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह 4,500mAh बॅटरी आहे.