Oppo Smartphone : जबरदस्त! Oppo ने लॉन्च केले दोन शक्तिशाली स्मार्टफोन, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Ahmednagarlive24 office
Published:

Oppo Smartphone : Oppo या कंपनीने Oppo A77s आणि Oppo A17 या नावाने जबरदस्त फीचर्स (Features) असलेले 2 नवीन स्मार्टफोन लॉन्च (Launch) केले आहेत, ज्यामुळे ग्राहकांमध्ये (customers) खरेदीसाठी स्पर्धा आहे.

फोन कंपनी Oppo ने भारतात 2 नवीन स्मार्टफोन Oppo A77s आणि Oppo A17 लॉन्च केले आहेत. Oppo A77s मध्ये Snapdragon 680 प्रोसेसर आणि Oppo A17 मध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे.

आता हे दोन्ही फोन विक्रीसाठी बाजारात आले आहेत. Oppo A77s आणि Oppo A17 फोनमध्ये कंपनीने काय फीचर्स दिले आहेत, जाणून घ्या सविस्तर.

Oppo A17 ची किंमत आणि उपलब्धता – Oppo A77s ची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन ऑफलाइन मोडमध्ये म्हणजेच रिटेल स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.

Oppo A77s चे फीचर्स- कंपनीने यामध्ये Snapdragon 680 प्रोसेसर बसवला आहे. हा फोन 50 MP च्या ड्युअल कॅमेरा सेटअपसह येतो.

तर त्याच वेळी या फोनमध्ये 8 एमपी फ्रंट कॅमेरा बसवण्यात आला आहे. Oppo ने फोन मध्ये 5000 mAh ची बॅटरी दिली आहे जी 33 W फास्ट चार्जिंग फीचर सह येते.

Oppo A77s ला 6.56-इंचाच्या LCD पॅनेलमधून HD + रिझोल्यूशन मिळेल. या फोनमध्ये 90 Hz चा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज आहे.

Oppo A77 ची किंमत (Price)

Oppo A17 ची किंमत 12,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन ऑफलाइन मोडमध्ये म्हणजेच रिटेल स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.

Oppo A17 ची वैशिष्ट्ये

कंपनीने या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर दिला आहे. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर हा फोन 50 MP चा डुअल कॅमेरा सेटअप सह येतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 5 एमपी फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये 5000 mAh बॅटरी उपलब्ध आहे.

Oppo A17 स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच डिस्प्ले आहे. हा फोन 60 Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. या Oppo फोनमध्ये 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज आहे.

याच कंपनीच्या Oppo A77s आणि Oppo A17 या दोन्ही फोनमध्ये ड्युअल सिम, 3.5mm जॅक, वाय-फाय आणि ब्लूटूथ यांसारखी सर्व वैशिष्ट्ये आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe