Oppo Smartphone Offer : सध्या सणासुदीचा हंगाम सुरु आहे. तुम्ही आता Oppo चा सर्वोत्तम 5G फोन सवलतीत खरेदी करू शकता. अशी शानदार ऑफर कंपनीच्या वेबसाइटवर मिळेल. 100W चार्जिंगसह हा फोन येईल. पहा संपूर्ण ऑफर.
Oppo Reno10 Pro+ 5G हा कंपनीच्या वेबसाईटवर खूपच कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. या फोनची मूळ किंमत 59,999 रुपये इतकी आहे. हा फोन 54,999 रुपयांना खरेदी करता येईल. तुमच्याकडे फेडरल, ICICI, HDFC, बँक ऑफ बडोदा किंवा Axis बँक कार्ड असल्यास तुम्हाला फोनवर 4,000 रुपयांपर्यंतची झटपट सवलत मिळेल. या फोनवर 37,450 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल.
जाणून घ्या Oppo Reno10 Pro+ 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
कंपनीकडून Oppo Reno10 Pro+ 5G या फोनमध्ये 2772×1240 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.74 इंच वक्र OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz च्या रीफ्रेश दर आणि 240Hz च्या टच सॅम्पलिंग दरासह तुम्हाला खरेदी करता येईल.
या फोनची पीक ब्राइटनेस पातळी 1100 nits पर्यंत जाते. स्टोरेजचा विचार केला तर हा फोन 12 GB LPDDR5 रॅम आणि 256 GB UFS3.1 स्टोरेजने सुसज्ज आहे. तसेच प्रोसेसर म्हणून, यामध्ये Adreno 730 GPU सह Snapdragon 8 Gen 1 चिपसेट येईल.
तसेच ग्राहकांना फोटोग्राफीसोबतच या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे मिळतील. यात 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सोबत 64-मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सर आणि 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा असेल. तर त्याच वेळी, सेल्फीसाठी तुम्हाला Oppo Reno10 Pro+ 5G फोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल.
Oppo च्या या फोनमध्ये 4700mAh ची बॅटरी दिली असून ही बॅटरी 100 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनच्या OS बद्दल सांगायचे झाले तर हा फोन ColorOS 13.1 वर काम करतो. तर कनेक्टिव्हिटीसाठी Oppo Reno10 Pro+ 5G या फोनमध्ये Wi-Fi 6, Bluetooth 5.3, USB Type C हेडफोन जॅक आणि NFC सारखे पर्याय मिळतील.