Oppo Smartphone Offer : Oppo चा फोल्डेबल फोन 20 हजारांपर्यंत स्वस्तात करा खरेदी, जाणून घ्या फीचर्स आणि ऑफर

Ahmednagarlive24 office
Published:
Oppo Smartphone Offer

Oppo Smartphone Offer : भारतीय बाजारात आता फोल्डेबल फोन लाँच होऊ लागले आहेत. या फोनमध्ये एकापेक्षा जबरदस्त फीचर्स दिली आहेत, या फोनच्या किमती इतर फोनपेक्षा महाग आहेत. परंतु आता तुम्ही फोल्डेबल फोन स्वस्तात खरेदी करू शकता.

भारतीय बाजारात Oppo Find N3 Flip आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. तुम्हाला ते ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेल स्टोअरमधून खरेदी करता येतील. कंपनीने हा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह एकाच प्रकारात लॉन्च केला आहे. किमतीचा विचार केला तर त्याची किंमत 94,999 रुपये इतकी आहे. हे क्रीम गोल्ड, मिस्टी पिंक, स्लीक ब्लॅक कलर पर्यायांत येतो.

तसेच 12,000 रुपयांपर्यंतच्या कॅशबॅक ऑफरचा लाभ घेता येईल. 24 महिन्यांपर्यंत विनाखर्च EMI प्लॅनची निवड करता येईल. हे लक्षात घ्या ही ऑफर आयसीआयसीआय बँक, एसबीआय कार्ड्स, बजाज फिनसर्व्ह, टीव्हीएस क्रेडिट, कोटक बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, एचडीबी वित्तीय सेवा आणि वन कार्डसह विविध बँकांद्वारे खरेदी करता येईल इतकेच नाही तर अग्रगण्य फायनान्सर्स 24 महिन्यांपर्यंत शून्य डाउन पेमेंट योजना ऑफर मिळेल.

ओप्पोचे ग्राहक असाल तर तुम्ही 8,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल. फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पोर्टेबल PU फोन केस आणि एक वर्षाचे स्क्रीन संरक्षण मोफत मिळेल.

जाणून घ्या खासियत

OPPO च्या फोनमध्ये 3.26-इंच वर्टिकल कव्हर स्क्रीन मिळेल. जी Gmail, Google Calendar, YouTube आणि WhatsApp सारख्या लोकप्रिय अॅप्ससह 40 पेक्षा जास्त तृतीय-पक्ष अॅप्सना सपोर्ट मिळेल, यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

फोनचे वजन 198 ग्रॅम असून यात 6.8 इंचाचा मुख्य डिस्प्ले देण्यात आला आहे. हे फुल एचडी प्लस LTPO AMOLED पॅनेल आहे. त्याचा रिफ्रेश दर 120 Hz पर्यंत असून डिस्प्लेच्या मजबुतीबद्दल, कंपनीचे असे मत आहे की याला 6 लाख वेळा फोल्ड आणि अनफोल्ड केला तरी काहीही होणार नाही, यात Dolby Atmos सह ड्युअल स्पीकर सेटअप असेल.

कंपनीचा दावा आहे की, तीन रियर कॅमेरे असणारा हा पहिला फ्लिप फोल्ड फोन असून यात फोटोग्राफीसाठी, हॅसलब्लॅड समर्थित ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 48-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा तसेच 2x ऑप्टिकल झूम असणारा 32-मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आहे. यामध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सेल लेन्स दिली आहे.

हा फोन MediaTek Dimension 9200 प्रोसेसरने सुसज्ज असून यामध्ये 44W SuperVooc फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,300mAh बॅटरी दिली आहे. फोन 56 मिनिटांत 0 ते 100% पर्यंत चार्ज होईल. 15 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये चार तासांचे व्हिडिओ स्ट्रीमिंग करता येईल. यात 5G, 4G LTE, Wi-Fi 7, Bluetooth 5.3, NFC, GPS आणि USB Type-C पोर्ट सारखे फीचर्स आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe