Oppo Smartphone Offer : Oppo च्या फोनवर मिळत आहे आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर, वाचतील हजारो रुपये

Ahmednagarlive24 office
Published:
Oppo Smartphone Offer

Oppo Smartphone Offer : भारतीय बाजारात ओप्पोच्या स्मार्टफोनला खूप मागणी आहे. त्यामुळे कंपनीही आपले शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपला Oppo A17k हा फोन लाँच केला होता. जो आता तुम्ही खूप स्वस्तात खरेदी करू शकता.

त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल. Oppo च्या फोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर मिळत आहे. Amazon ने खास तुमच्यासाठी एक ऑफर आणली आहे. फोनची मूळ किंमत 12,999 रुपये आहे. परंतु तुम्ही तो प्राइम अर्ली डीलमध्ये, 31% सवलतीनंतर ते 8,999 रुपयांना खरेदी करू शकता. बँक ऑफरमध्ये तुम्हाला या फोनची किंमत 900 रुपयांनी कमी करता येईल. एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 8,350 रुपयांपर्यंत स्वस्त होईल.

जाणून घ्या Oppo A17k चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

स्टोरेजचा विचार केला तर कंपनी Oppo A17k या स्मार्टफोनमध्ये 3 GB LPDDR4x रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज देत असून या फोनची खास गोष्ट म्हणजे कंपनीने या फोनमध्ये 4 GB व्हर्चुअल रॅम देखील उपलब्ध करून दिली आहे.

यासह, या फोनची एकूण रॅम 7 GB पर्यंत जात आहे. शिवाय MediaTek Helio G35 चिपसेट प्रोसेसर म्हणून देण्यात आला. वापरकर्त्यांना फोटोग्राफीसाठी, Oppo A17k च्या मागील पॅनलवर LED फ्लॅशसह 8-मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा मिळेल. तसेच या फोनमध्ये सेल्फीसाठी तुम्हाला ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल.

इतकेच नाही तर तुम्हाला या फोनमध्ये सेगमेंटमधील सर्वोत्तम डिस्प्ले मिळेल. जो ६.५६ इंचाचा असून तो 90Hz च्या रीफ्रेश दरासह येते. या फोनच्या डिस्प्लेची शिखर ब्राइटनेस पातळी 600 nits आहे. फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी 5000mAh आहे.

ही बॅटरी 10 वॅट चार्जिंगला सपोर्ट करेल. Oppo चा हा बजेट फोन ColorOS 12.1 वर काम करतो. कंपनीकडून कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये Wi-Fi 5, Bluetooth 5.3, Micro USB पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे पर्याय दिले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe