Oppo Upcoming Smartphone : देशातील लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पो आपल्या ग्राहकांच्या मागणीनुसार अनेक स्मार्टफोन लाँच करत असते. शानदार फीचर्समुळे कंपनीचे स्मार्टफोन सतत इतर कंपन्यांच्या स्मार्टफोनला टक्कर देत असते.
अशातच आता कंपनी आपला नवीन A98 5G स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. परंतु अजूनही कंपनीने नवीन फोनच्या लाँच तारीख आणि किमतीबाबत कोणताही खुलासा केला नाही. मात्र लाँच होण्यापूर्वी या फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन लीक झाले आहे.

या फोनच्या मागील बाजूस, कंपनीकडून ट्रिपल कॅमेरा सेटअपसाठी दोन गोलाकार कटआउट देण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्या कटआउटमध्ये एलईडी फ्लॅश बसवला आहे. या फोनच्या कॅमेरा युनिटजवळ देण्यात आलेल्या मजकुरावरून याची पुष्टी झाली आहे.
कंपनीचा हा आगामी फोन 40x पर्यंत मायक्रोस्कोप लेन्ससह येणार आहे. या फोनच्या पुढील बाजूस देण्यात आलेलं पातळ बेझल त्याचा लूक जास्त आकर्षक बनवतात. या फोनचा डिस्प्ले सपाट असून याच्या डाव्या बाजूला व्हॉल्यूम रॉकर तसेच उजव्या बाजूला पॉवर बटण देण्यात आले आहे.
जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
या फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन ड्रीमी ब्लू आणि कूल ब्लॅक कलर पर्यायांमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल. तसेच कंपनीकडून फोनमध्ये आपली नवीनतम ग्लो डिझाइन भाषा वापरण्यात येणार आहे. त्यामुळे या फोनचा मागील पॅनल फिंगरप्रिंट आणि स्क्रॅच प्रतिरोधक बनत आहे. लीकनुसार, कंपनी या फोनमध्ये 6.72-इंचाचा एलसीडी पॅनल देणार असून हा फुल एचडी + डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येणार आहे.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 64-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा उपलब्ध असेल. याशिवाय, 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आणि 40x झूमसह 2-मेगापिक्सेल मायक्रोलेन्स येथे समाविष्ट केले जातील. त्याच वेळी, कंपनी सेल्फीसाठी या फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देणार आहे.
स्टोरेजचा विचार केला तर कंपनी हा फोन 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज पर्यायामध्ये लॉन्च करणार आहे. तसेच तुम्हाला यात 8 जीबी व्हर्च्युअल रॅमचा सपोर्टही मिळणार आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी यात स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देईल. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी मिळेल, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. हा फोन तुम्ही 5 मिनिट चार्ज केला तर तो 6 तास टिकतो असा दावा कंपनीने केला आहे.