विरोधकांनी कोपरगाव शहराच्या विकासात आडकाठी निर्माण केली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  कोपरगाव शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्षांना पाठींबा दिला. मात्र निवडणुकीतील पराभव विसरता येत नसल्यामुळे विरोधकांनी मागील साडेचार वर्षापासून कोपरगाव शहराच्या विकासात आडकाठी घातली आहे.

या विकासकामांना विरोधकांनी पुन्हा न्यायालयातून आणलेली स्थगिती शहर विकासासाठी घातक आहे, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. काही महिन्यांपूर्वी शहरातील महत्वाच्या रस्त्यांबरोबरच एकूण २८ कामांना पालिकेच्या सभागृहात विरोधकांनी बहुमताच्या बळावर विरोध केला.

मात्र लोकशाहीच्या मार्गाने विरोधकांना नामोहरम करून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष व शहर विकासाची बांधिलकी असणाऱ्या काही नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून ही कामे मंजूर करून आणली. कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदवितरण समारंभ आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडला.

याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न सुटू नये त्यासाठी विरोधकांनी पडद्यामाघून ५ नंबर साठवण तलाव होऊ नये, यासाठी खोडा घालण्याचा प्रयत्न केला.

मात्र पाच नंबर साठवण तलावाचे काम व्हावे यासाठी मी केलेल्या धरणे आंदोलनाच्या वेळी संपूर्ण कोपरगाव शहरातील जनता माझ्यासोबत होती. कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास व्हावा हि माझी तळमळ आहे.

मात्र कोपरगाव नगरपरिषदेत बहुमताच्या जोरावर २८ विकासकामांना न्यायालयातून स्थगिती आणली जाते हि शहराच्या विकासाच्या दृष्टीने दुर्दैवाची बाब आहे. भविष्यात कोपरगाव शहराच्या विकासात अशा अडचणी निर्माण होणार नाहीत. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला एकहाती सत्ता महत्वाची आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe