‘ह्या’ 5 ठिकाणी पैसे कमवण्याची संधी ; व्हाल मालामाल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. परंतु गुंतवणूकदारांना असे वाटते की अनेक शेअर्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पण ते तसे नाही. ब्रोकर कंपनी शेअरखानने गुंतवणूकीसाठी निवडक शेअर्स सुचवले आहेत.

या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास 1 वर्षात 32 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकेल, असे शेअरखान यांनी सांगितले. या कंपन्यांची निवड तिसऱ्या तिमाहीच्या आर्थिक निकालानंतर जाहीर करण्यात आल्याची माहिती दलाली संस्था शेअरखान यांनी दिली. टॉप 5 शेअर कोणते आहेत, जे गुंतवणूकीवर चांगला परतावा देऊ शकतात ते जाणून घेऊयात –

इप्का लेबोरेटरीज –

शेअरखान ब्रोकरेज हाऊसने इप्का लेबोरेटरीजची टार्गेट प्राइस 2,560 रुपये असल्याचे सांगितले आहे. शेअरखान यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की, इप्का आपल्या गुंतवणूकदारांना अल्प काळात 32 टक्के परतावा देऊ शकेल. इप्काचा स्टॉक सध्या 1,936.10 रुपये आहे.

कंपनी सक्रिय औषधनिर्माण घटकांचा मोठा व्यवसाय करते, ज्यांना सध्या जास्त मागणी आहे. ही मागणी कायमच राहिल असे मत शेअरखान यांना वाटते. मध्य प्रदेशातील रतलाम येथे ही कंपनी 50एमटी क्षमतेचा नवीन प्रकल्पदेखील उभारत असून पुढील वर्षी हा प्रकल्प सुरू होईल.

गुजरात गॅस –

शेअर यांनी गुजरात गॅस कंपनीच्या शेअर्सचे प्राइस टार्गेट 500 रुपये जाहीर केले आहे. सध्या गुजरात गॅसचा शेयर 379.75 रुपये आहे. अशा प्रकारे शेअरखानच्या मते, गुंतवणूकदारांना 1 वर्षात 31 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकेल. औद्योगिक पीएनजीमध्ये गुजरात गॅसचा वाढता भाग आणि व्हॉल्यूममध्ये वाढ यामुळे आर्थिक वर्षात कंपनीचे उत्पन्न वाढू शकते.

करानंतर कंपनीचा नफा 23% सीएजीआर होऊ शकतो, अशी अपेक्षा शेअरखान यांनी व्यक्त केली आहे. यामुळे कंपनीचा शेअर दर वाढेल.

एचपीसीएल –

शेअरखान यांना हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) चे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेअरखानने एचपीसीएलला 275 रुपयांची टार्गेट प्राइस दिली आहे. सध्या त्याची किंमत 225.55 रूपये आहे.

या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास 22% पर्यंत परतावा मिळू शकेल, असे शेअरखान यांनी म्हटले आहे. यामुळे एचपीसीएलमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते असे शेखरखान यांनी म्हटले आहे.

पीएनसी इंफ्राटेक –

पीआरसी इन्फ्राटेकला शेअरखानने 300 रुपये प्राइस टार्गेट दिले आहे. हा शेअर सध्या सुमारे 244.75 रुपये दराने चालला आहे. हा शेअर 1 वर्षात गुंतवणूकदारांना 22% पर्यंत परतावा देऊ शकतो असे शेअरखान म्हणतात. रस्ता बांधकामात पीएनसी इन्फ्राटेकचा वाटा सर्वात चांगला आहे.

शानदार बॅलन्सशीट, मजबूत ऑर्डर बुक आणि उत्कृष्ट भांडवल व्यवस्थापनामुळे रस्ते पायाभूत सुविधांच्या बांधकामात कंपनीला सर्वाधिक फायदा होत आहे.

ट्रेंट –

ट्रेंटच्या स्टॉकला शेअरखानने 825 रुपयांचे टारगेट प्राइस दिले आहे. ट्रेंटच्या स्टॉकची किंमत सध्या 686.70 रुपये आहे. शेअरखानच्या म्हणण्यानुसार, हा स्टॉक 1 वर्षात सहजपणे 20% पर्यंत परतावा देऊ शकेल.

शेअरखानने 2022 च्या आर्थिक वर्षाच्या कंपनीच्या उत्पन्नाचा अंदाज दहा ते 12 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचबरोबर लॉकडाऊननंतर कंपनीच्या व्यवसायात अपेक्षेपेक्षा वेगवान पुनर्प्राप्ती झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe