Maharashtra News:आपल्या करारी बाण्यासाठी ओळखले जाणारे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार शनिवारी सकाळी नांदेडच्या रेणुकादेवीसमोर नतमस्तक झाले.
विशेष म्हणजे त्यांच्या देवदर्शनाचे फारसे फोटो काढले जात नाहीत, मात्र हा फोटो व्हायरल झाला आहे.अजित पवार आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी सकाळी त्यांनी नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे जाऊन रेणुकादेवी मंदिराच्या पायथ्याशी रेणूका मातेचे दर्शन घेतले.
अतिवृष्टी व पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीतून सावरण्याचे बळ शेतकरी बांधवांना दे, अशी प्रार्थना रेणुका मातेचरणी केल्याचे पवार यांनी सांगितले. त्यांच्यासोबत धनंजय मुंडे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मंदिराच्या पायऱ्यांवरच पवार यांनी डोके टेकविले. उपस्थितांनी याची छायाचित्रे टिपली आणि नंतर ती व्हायरलही झाली आहेत.