Krushi news : देशातील शेतकरी बांधव (Farmers) गेल्या अनेक वर्षांपासून रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) अनिर्बंध वापर करीत आहेत.
यामुळे सुरुवातीला शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात (Farmers Income) मोठी वाढ झाली. मात्र काळाच्या ओघात रासायनिक खतांचा अनिर्बंध वापरामुळे जमिनीचा पोत (Soil Health) खालवला गेला आणि परिणामी जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला.

परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पादनात (Farmers Income Decrease) मोठी कपात झाली शिवाय यामुळे मानवाचे आरोग्य (Human Health) देखील धोक्यात सापडू लागले. रासायनिक खतांचे हेच दुष्परिणाम लक्षात घेता आता अनेक शेतकरी बांधव सेंद्रिय शेतीकडे (Organic Farming) वळू लागले आहेत.
विशेष म्हणजे आता मायबाप शासन देखील सेंद्रिय शेतीला प्रोत्साहित करीत आहे. उत्तर प्रदेशातील बुदेलखंड मधील एका अवलियाने देखील रासायनिक खतांचा दुष्परिणाम लक्षात घेऊन सेंद्रिय शेतीला सुरवात केली अन सेंद्रिय शेतीतुन चांगली लाखों रुपये उत्पन्न कमवण्याची किमया साधली आहे.
खरं पाहता बुंदेलखंड हा भाग दुष्काळामुळे नेहमीच चर्चेत राहत असतो. या भागाची अवस्था कोणापासून लपलेली नाही. पण इथे असेही अनेक शेतकरी आहेत जे या दुष्काळग्रस्त भागात शेतीच करत नाहीत तर त्यात चांगले यशही मिळवत आहेत.
प्रेम सिंह देखील अशाच शेतकऱ्यांपैकी एक आहेत. प्रेम सिंह हे उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील मौजे बरोखर येथील रहिवासी शेतकरी आहेत. खरं पाहता, प्रेम सिंह उच्चविद्याविभूषित आहेत. त्यांनी 1987 मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे.
मात्र शेतीची आवड असल्याने नोकरीमागे न पळता ते शेतीकडे वळले आहेत. उपजीविकेचे साधन म्हणून शेतीची निवड करणे प्रेमसिंग यांच्यासाठी अजिबात सोपे नव्हते.
शेती करण्याचा निर्णय घेतला खरं मात्र प्रेम सिंह यांना घरातील लोकाचा मोठा विरोध सहन करावा लागला. घरचे खुप संतापले, मात्र त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला अन शेती कसण्यास सुरवात देखील केली.
प्रेमसिंग आता गेल्या 30 वर्षांपासून त्यांच्या 25 एकर शेतजमिनीत सेंद्रिय शेती करत आहेत, ज्याला ते रोटेशनल फार्मिंग देखील म्हणतात. त्यांची शेती करण्याची पद्धत इतर शेतकऱ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी असल्याचा त्यांचा दावा आहे.
विशेष म्हणजे प्रेम सिंह शेतीत मिळणाऱ्या उत्पादनाचे व्हॅल्यू ऍडिशन करतात म्हणजेच शेतीमाल थेट बाजारात विकत नाहीत, तर त्यापासून अनेक उत्पादने तयार करतात आणि मग विकतात. प्रेम गव्हापासून लापशी आणि पीठ तयार करतात, जे दिल्लीसह अनेक शहरांमध्ये चढ्या दराने विकले जाते.
प्रेमसिंग यांच्या या सूत्रामुळे देशातीलच नव्हे तर परदेशातील शेतकरी त्यांच्याकडून शिकण्यासाठी बुदेलखंडमध्ये येतात आणि त्यांच्याकडून शेती व्यवसायातील कसब जाणुन घेतात आणि प्रभावित होऊन रासायनिक शेती सोडून सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत.
काय आहे प्रेम सिंह यांची रोटेशनल फार्मिंग
प्रेम सिंह यांनी शेती व्यवसायात पदार्पण केल्यानंतर त्यांना शेतीत उत्पादन खर्च अधिक होतं असल्याचे जाणवले. मग त्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी एकत्रित पणे अनेक पिकांची लागवड करण्यास सुरुवात केली.
त्यांनी रोटेशनल फार्मिंग करण्यास सुरवात केली. प्रेम सिंग यांच्या मते, जर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील एक तृतीयांश क्षेत्रात फळबागेची लागवड केली, तर एक तृतीयांशमध्ये पशुपालन करायला पाहिजे, तर उर्वरित एक तृतीयांश त्यांच्या कुटुंबासाठी आवश्यक असलेल्या अन्नधान्य, कडधान्ये, तेल, भाजीपाला, अशा पिकांची प्रदेशातील हवामानानुसार लागवड केली पाहिजे.
यामध्ये उत्पादीत झालेला माल ते त्यांच्या घरासाठी वापरू शकता आणि उरलेल्यावर प्रक्रिया करून बाजारात विकू शकता. प्रेम सिंग त्यांच्या एकूण उत्पादनातून 40 ते 42 टक्के उत्पादनांवर प्रक्रिया करतात.
प्रक्रिया युनिट्स रोजगाराच्या संधी निर्माण करतात जे स्वतःसोबतच अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यास मदत करतात. या संपूर्ण मॉडेलला रोटेशनल फार्मिंग असे प्रेम सिंह यांनी नाव दिले आहे. निश्चितच प्रेम सिंह यांचं हे मॉडेल इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे सिद्ध होणारे आहे.