अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2022 Maharashtra news :- महाराष्ट्र (Maharashtra) महान लोकांचे राष्ट्र म्हणून ओळखले जाते. आपल्या राज्यातील लोकांनी प्रत्येक क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवीत महाराष्ट्राचा मान कायमच उंचावला आहे.
अशीच एक अभिमानास्पद बाब पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून समोर येत आहे. जुन्नर तालुक्याच्या मौजे नारायणगाव येथील रहिवासी शेतकरी संतोष भास्कर निंबाळकर (Santosh Bhaskar Nimbalkar) यांनी नुकतेच दिल्ली दरबारी तसेच पंजाब राज्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबद्दल (Organic Farming) मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, संतोष पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती बद्दल नेहमीच मार्गदर्शन करीत आले आहेत.
ते शेतकऱ्यांकडे सेंद्रिय शेती करण्याचा नेहमीच आग्रह धरत असतात. नुकतेच संतोष दिल्ली पंजाब आणि हरियाणा या राज्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी गेले होते.
यावेळी संतोष यांनी शेतकऱ्यांना बियाणे उत्पादन आणि मार्केटिंग बद्दल सविस्तर आणि अतिशय उपयुक्त माहिती शेतकऱ्यांना दिली. संतोष यांच्या कार्याची दखल समाजाच्या प्रत्येक स्तरावरून घेतली जात आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी देखील त्यांच्या या कार्याची दखल घेतली आहे.
अमोल कोल्हे यांनी संतोष यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या जुन्नर सारख्या तालुक्यातून परराज्यात जाऊन सेंद्रिय शेतीबद्दल तेथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे ही निश्चितच महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे.
यामुळे महाराष्ट्राच्या शिरेपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. संतोष यांनी पंजाब हरियाणा आणि दिल्ली येथील शेतकऱ्यांना केवळ मार्गदर्शन केले असे नाही तर त्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निरसन करण्याचे देखील या वेळी प्रयत्न केले आहेत.
याशिवाय तेथील शेतकऱ्यांची पीक पद्धतीची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळावे यासाठी कंपोस्ट आणि सेंद्रिय खतांची निर्मिती कशी केली जाऊ शकते याबाबत विस्तृत माहिती देखील यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिली आहे.
संतोष यांनी आपल्या पंजाब वारीसाठी काही आपल्या राज्यातील शेतकरी देखील सोबतीला नेले होते. जेणेकरून हे शेतकरी देखील सेंद्रिय शेतीबद्दल विस्तृत माहिती घेऊ शकतील आणि सेंद्रिय शेती करू लागतील.
सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक पाणी माती आणि हवा या घटकांचा प्रभावीपणे वापर होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. संतोष यांनी सांगितले की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी देखील सेंद्रिय शेतीचा ध्यास आता धरला पाहिजे. एकंदरीत संतोष यांची ही कामगिरी महाराष्ट्राचे नाव रोशन करणारी आहे.