“आमचं राजकारण स्वाभिमान, कामावर आणि संघर्षावर नकलांवर नाही” संजय राऊत यांचा राज ठाकरेंना टोला

Content Team
Published:

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त बोलत असताना चौफेर फटकेबाजी केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची नक्कल करत त्यांच्यावर टोलेबाजी केली होती.

यावेळी राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही निशाणा साधला आहे. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांची ही नक्कल करत टीका केली आहे.

संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना उत्तर देत म्हणाले, ‘नक्कल केली चांगील गोष्ट आहे. नक्कल मोठ्या माणसांची करतात. तुम्ही बोला, तुम्ही बोललं पाहिजे, सगळ्यांनी बोललं पाहिजे अशी स्थिती आहे.

ईडीनं आम्हाला बोलावलं म्हणून गप्प बसलेलो नाही. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. जे सत्य आहे त्यावर शिवसेना बोलणार डुप्लिकेट काही नाही. आमचं राजकारण नकलांवर उभं नाही. आमचं राजकारण स्वाभिमान, कामावर आणि संघर्षावर उभं आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालांबद्दल उद्या पाहावं लागेल. काही लोक आजारी नसताना ही सक्रीय नसतात. मुख्यमंत्र्या इतक कुणीच सक्रिय नाही, म्हणून तर राज्य पुढं चाललंय’ असे म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरेंना उत्तर दिले आहे.

राज ठाकरे संजय राऊत यांच्याबद्दल काय म्हणाले?

ते संजय राऊत… किती बोलतात. सगळ्यांची एक अॅक्शन असते. चॅनल लागलं की हे सुरु, कॅमेरा हटला की सगळं नॉर्मल. एकदा असाच एका सभेला गेलो होतो. सगळं साधं व्यवस्थित बोलत होते.

तेवढ्यात त्यांच्या नावाची घोषणा नाही. मी आलो.. भाषण करतो.. म्हटलं ये. आज.. इखे जमलेले सर्व…. अरे आता नीट बोलत होता. काय प्रॉब्लेम झाला. डोळे मोठे करणार, भुवया उडवणार.. किती बोलतो.

प्रश्न बोलायचा नाही. आपण काय बोलतो आहोत, कसं बोलतो आहोत. भविष्यातल्या महाराष्ट्रातल्या पिढ्या पाहत आहेत हे. ते उद्या काय शिकतील? अशी नक्कल राज ठाकरे यांनी केली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe