Maharashtra news : राज्यातच नव्हे तर देशातील लोकांचे लक्ष महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर लागले आहे. शिवसेनेतील फुटीची आणि त्या अनुषंगाने महाविकास आघाडी सरकारचे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत सर्वाधिक चर्चा झाली ती कोरोना उपाय योजनांची आणि निर्णय घेतला तो २०२१ पर्यंतचे सर्व राजकीय गुन्हे मागे घेण्याचा.

त्यामुळे मंत्रीही आवक झाले.सध्याच्या राजकीय आपतकालीन स्थिती ही बैठक बोलाविण्यात आल्याने यावर चर्चा होईल, अशी अपेक्षा इतरांसोबत मंत्र्यांनाही होतीच. त्यात राजीनामे आणि विधानसभाच बरखास्तीच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या.
त्यामुळे मुख्यमंत्री यासंबंधी काय बोलतात, याकडे लक्ष होते. प्रत्यक्षा दहा मिनिटांहून अधिक काळ कोरोनासंबंधी चर्चा झाली. राज्यातील स्थितीचा आढावा घेतला, मास्कची सक्ती करायची, यासंबंधी आरोग्य मंत्र्यांना विचारणा करण्यात आली.
मुख्यमंत्री बैठकीत ऑनलाइन सहभागी झाले होते. बैठकीच्या शेवटी सर्व मंत्र्यांना उद्देशून धन्यवाद, असेच सहकार्य असून द्या, असेही ते म्हणाले. बैठकीत मुख्यमंत्री अगदीच निर्धास्त वाटत होते, असे मंत्री सांगत आहेत. शिवसेनेचे केवळ तीनच मंत्री बैठकीला उपस्थित होते