अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- सहकार चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्र घडवणाऱ्या पद्मश्री डॉ. विखे पाटील यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराला उचित न्याय देण्याचे काम माझ्या हातून घडावे आशी भावना पर्यावरणाचे अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केली.
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून दरवर्षी साहीत्य, कलागौरव आणि प्रबोधनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तीना पद्मश्रीच्या नावाने पुरस्कार देवून गौरविण्यात येते.यंदा समाजप्रबोधनाचा पुरस्कार पर्यावरणचे अभ्यासक अतुल देऊळगावकर यांना देण्याचा निर्णय पुरस्कार निवड समितीने घेतला.पुरस्कारांची ही परंपरा मागील तीस वर्षापासून अखंडीतपणे सुरू आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या हस्ते पद्मश्रीच्या जयंतीदीनी नारळी पौर्णिमेला हे पुरस्कार प्रदान केले जातात. कोव्हीड संकटामुळे मागील वर्षी साहीत्य पुरस्कार सोहळा होवू शकला नाही.यंदाही तीच परीस्थीती कायम असल्याने सांस्कृतिक कार्यक्रमावर सरकारचे निर्बंध कायम आहेत.
तसेच दोन्ही वर्षाचे साहीत्य संमलेनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो आणि डॉ जयंत नारळीकर यांनी तब्येतीच्या कारणाने कार्यक्रमास उपस्थित राहाण्यास असमर्थता दर्शविल्याने सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तिंना घरी जावूनच सन्मानित करण्याचा निर्णय आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा परीवाराने घेतला.
समाजप्रबोधन पुरस्काराचे मानकरी अतुल देऊळगावकर यांना लातूर येथे त्यांच्या निवासस्थानी जावून प्रवरा परीवाराने पुरस्कार प्रदान केला.डॉ.विखे पाटील कारखान्याचे संचालक संजय आहेर,बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब जपे,पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब म्हस्के आदी याप्रसंगी उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्या नंतर अतुल देऊळगावकर यांनी आपली कृतज्ञता व्यक्त करताना, पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली.डॉधनंजय गाडगीळ वैकुंठभाई मेहता यांच्या सहकार्याने महाराष्ट्र घडला.यामुळेच महाराष्ट्र उद्योग शिक्षण सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात घट्ट पाया रोवला गेला.
पद्मश्रींच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराला उचित न्याय देण्याचे काम माझ्या हातून घडावे ही भावना अतुल देऊळगावकर यांनी बोलून दाखवली. समाजप्रबोधन पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के,
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनी विखे पाटील प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ राजेंद्र विखे पाटील खा.डॉ सुजय विखे पाटील पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रा डॉ रावसाहेब कसबे निमंत्रक प्रा डॉ राजेंद्र सलालकर यांनी अभिनंदन केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम