PAN Card : पॅन कार्ड आता प्रत्येक आर्थिक कामांसाठी वापरण्यात येते. इतकेच नाही तर शासकीस कामातही याचा वापर करण्यात येतो. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर तुमचे कोणतेही आर्थिक काम होऊ शकत नाही.
तसेच तुम्हाला नुकसानही सहन करावे लागू शकते. त्यामुळे तुमच्याकडे आता पॅन कार्ड असणे खूप गरजेचे आहे. तसेच ज्या नागरिकांकडे पॅन कार्ड आहे त्यांना ते आधार कार्डसोबत लिंक करावे लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी सतत अपडेट दिले होते.

आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत बऱ्याच वेळा वाढवून देण्यात आली आहे. सध्याची लिंक करण्याची शेवटची मुदत 30 जून 2023 ही आहे त्यामुळे यावेळी तुम्ही तुमचा पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केले नाही तर दुसऱ्याच दिवसापासून तुमचा पॅन कार्ड अवैध होईल. ज्या लोकांना सूट मिळाली असेल तर त्यांना आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करावे लागणार नाही.
या नागरिकांना लिंक करावे लागणार नाही
केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून मे 2017 मध्ये जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, कोण ‘मुक्त श्रेणी’ अंतर्गत येतात याचा तपशील दिला आहे.
- आसाम, मेघालय आणि जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात राहणारे नागरिक
- आयकर कायदा, 1961 नुसार अनिवासी
- मागील वर्षात कधीही ऐंशी वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असणारे नागरिक
- भारतीय नागरिक नसणे
हे समजून घ्या की आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंकेजची गरज वर नमूद करण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला लागू होत नाही. देण्यात आलेल्या सवलती नवीनतम सरकारी अधिसूचनांच्या आधारे बदलांच्या अधीन असणार आहेत.