PAN Card Update : आजकाल आधारकार्ड आणि पॅनकार्ड ही कागदपत्रांपैकी एक महत्वाची कागदपत्रे बनली आहेत. तुम्हाला बँकेमधील कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी पॅनकार्ड अनिवार्य आहे. तसेच इतर सरकारी किंवा खाजगी कामांसाठी पॅनकार्ड एक महत्वाचे कागदपत्र बनले आहे.
मात्र अनेकदा पॅनकार्डचा गाइवापर केला जातो. तसेच पॅनकार्डवरून कर्ज देखील काढता येत असल्याने अनेकांची ऑनलाईन फसवणूक केली जाते. मात्र पॅनकार्ड हे एक असे कागदपत्र आहे जे तुमच्या सर्व अर्थीक व्यवहारांचा तपशील ठेवत असते.

पॅनकार्डद्वारे सर्व आर्थिक व्यवहारांचा तपशील ठेवला जात असल्याने करदाते कर चुकवू शकत नाहीत. मात्र जर पॅनकार्ड संदर्भात तुमच्याकडील किरकोळ चूक तुमच्यासाठी १० हजार रुपयांच्या दंडाचे कारण बनू शकते.
पॅनकार्ड संदर्भात या गोष्टी लक्षात ठेवा
देशातील सर्व नागरिकांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅनकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच त्यासंबंधी काही नियम देखील बनवण्यात आले आहेत. देशातील एका व्यक्तीकडे एकच पॅनकार्ड असणे आवश्यक आहे.
तसेच ज्या व्यक्तीकडे २ पॅनकार्ड असतील त्यांना आयकर विभागाकडून नियमानुसार दंड ठोठावला जाऊ शकतो तसेच त्यांचे पॅनकार्ड देखील रद्द केले जाऊ शकते. तसेच ज्या व्यक्तीच्या पॅनकार्डमध्ये तफावत आढळेल त्या व्यक्तीचे बँक खाते देखील आयकर विभागाकडून गोठवले जाऊ शकते.
त्यामुळे जर तुमच्याकडेही दोन पॅनकार्ड असतील तर तुम्ही त्वरित ते आयकर विभागाकडे पाठवा. तसेच आयकर विभागाकडून ज्या व्यक्तीकडून पॅनकार्ड साठी दिली जाईल अशा व्यक्तींना १० हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फॉर्म भरताना किंवा पॅन कार्ड तपशील प्रविष्ट करणे आवश्यक असलेल्या इतर परिस्थितींमध्ये ही तरतूद विशेषतः महत्वाची आहे. ज्या व्यक्तींकडे दोन पॅनकार्ड असतील त्यांनी खालीलप्रमाणे आयकर विभागाकडे परत करावे.
कसे परत करावे
आयटी विभागाच्या Incometaxindia.gov.in वेबसाइटवर जा.
‘नवीन पॅन कार्ड/बदलाची विनंती’ किंवा ‘करेक्शन पॅन डेटा’ वर क्लिक करा.
फॉर्म डाउनलोड करा, भरा आणि कोणत्याही नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) कार्यालयात सबमिट करा.