“तेव्हा पांडे झोपले होते. एवढा मोठा एक दगड काच फोडून आत आला”

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना अटक केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे त्यांची भेट घेण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये गेले होते. त्यानंतर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्ये आमनेसामने आले.

यावेळी सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. किरीट सोमय्या यांना जखम झाली होती. त्यानंतर किरीट सोमय्या आणि भाजप (BJP) चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

आज किरीट सोमय्या यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडेंची (Sanjay Pandey) माफियागिरी सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई होणारच असा इशाराच दिला आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, प्रवीण दरेकरांसह आम्ही आठ जण आज राज्यपालांना भेटायला जात आहोत. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे माफियागिरी करत आहेत. माझ्या गाडीवर दगडफेक लाइव्ह दिसत होती.

तेव्हा पांडे झोपले होते. एवढा मोठा एक दगड काच फोडून आत आला. पांडेची इच्छा होती का, त्या दगडाने सोमय्यांचा डोळा, थोबाड फोडले पाहिजे. पांडेंनी जी एफआयार मी साइन केली नाही, ती वांद्रा पोलिसांना दिली.

त्यावर खार पोलीस यांनी अॅक्शन सुरू केली. या नकली कारवाईची चौकशी होणार. पांडेंवर कारवाई होणार असा थेट इशाराच किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

दरम्यान शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्या यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. ते म्हणाले, एक वेडा माणून ओठाखाली टोमॅटो सॉस लावून राष्ट्रपती राजवटीची मागणी करत असेल, तर त्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe