Parner Nagar Panchayat Election 2022 Live Updates साठी हे पेज रिफ्रेश करा Last Updated On 12.11
ओबीसी आरक्षणामुळे पुढे ढकललेल्या पारनेर नगर पंचायतीच्या चार प्रभागांसाठी मंगळवारी (दि.18) दिवसभर मतदान सुरळीतपणे पार पडले.या चार जागांसाठी 87.66 टक्के मतदान झाले आहे.
पारनेर नगरपंचायतीच्या 17 जागांची मतमोजणी सुरू झाली आहे.ओबीसी आरक्षणामुळे पुढे ढकललेल्या पारनेर नगर पंचायतीच्या चार प्रभागांसाठी मंगळवारी (दि.18) दिवसभर मतदान सुरळीतपणे पार पडले.
या चार जागांसाठी 87.66 टक्के मतदान झाले आहे. पारनेर नगरपंचायतीच्या 17 जागांची मतमोजणी सुरू झाली आहे.
11.45 AM : पारनेर नगरपंचायत त्रिशंकू !
पारनेर नगरपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सात, शिवसेनेला सहा, भाजप-शहर विकास आघाडीला तीन तर अपक्ष एक अशा जागा जिंकून आल्या आहेत.
या निवडणुकीत आमदार नीलेश लंके व माजी आमदार विजयराव औटी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत माजी आमदार औटी यांच्या पत्नी जयश्रीताई औटी पराभूत झाल्या आहेत.
सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी, शिवसेनेला शहर विकास आघाडीची साथ ध्यावी लागणार आहे. सध्या तरी पारनेर नगर पंचायतीच्या सत्तेची दोरी शहर विकास आघाडीच्या उमेद्वारांच्या हाती असल्याचे बोलले जात आहे.
प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
- प्रभाग 1 :- ठाणगे कांतीलाल शालुबाई :- शिवसेना
- प्रभाग 2 :- सुप्रिया सुभाष शिंदे :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
- प्रभाग 3 :- योगेश अशोक मते :- अपक्ष
- प्रभाग 4 :- नवनाथ तुकाराम सोबले :- शिवसेना
- प्रभाग 5 :- नितीन रमेश अडसूळ :- राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत
- प्रभाग 6 :- निता विजय औटी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
- प्रभाग 7 :- विद्या अनिल गंधाडे :- शिवसेना
- प्रभाग 8 :- भूषण उत्तम शेलार :- पारनेर शहर विकास आघाडी
- प्रभाग 9 :- हिमानी रामजी नगरे :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
- प्रभाग 10 :- सुरेखा अर्जुन भालेकर :- पारनेर शहर विकास आघाडी
- प्रभाग 11:- अशोक फुलाजी चेडे :- भाजपा
- प्रभाग 12 :- विद्या बाळासाहेब कावरे :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
- प्रभाग 13 :- विजय सदाशिव औटी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
- प्रभाग 14 :- निता देवराम ठुबे :- शिवसेना
- प्रभाग 15 :- जायदा राजू शेख :- शिवसेना
- प्रभाग 16 :- युवराज कुंडलिक पठारे :- शिवसेना
- प्रभाग 17 :- प्रियांका सचिन औटी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
आमदार विजय औटी यांच्या पत्नी जयश्री औटी यांचा पराभव !
पारनेरमध्ये शिवसेनेच्या उमेदवार माजी आमदार विजय औटी यांच्या पत्नी जयश्री औटी यांचा राष्ट्रवादीच्या हिमानी बाळासाहेब नगरे यांच्याकडून पराभव.