अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- पारनेर नगरपंचायतीच्या १७ जागांचा निकाल लागला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ७, शिवसेनेला ६, पारनेर शहर विकास आ घाडीला २ तर भाजप व अपक्ष प्रत्येक १ नगरसेवक निवडून आले.
या निवडणुकीत वाॅर्ड क्रमांक ९ मधून विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या पत्नी, महाराष्ट्रातील पहिल्या महिला पंचायत समिती सभापती सौ.जयश्री औटी यांना धुळ चारत राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वसामान्य नवखी उमेदवार कु.हिमानी नगरे जायंट किलर ठरल्या आहे.
प्रभाग ९ वॉर्डची जबाबदारी निलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव सरसेनापती तसेच MLA Nilesh Lanka चे एकनिष्ठ सहकारी पोटघन मेजर यांच्यावर देण्यात आली होती, त्यांनी ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडत माजी आमदारांच्या सौभाग्यवतींचा पराभव करण्याची किमया साधली आहे.
या अचंबित करणाऱ्या विजयामुळे ऐन २०-२५ वर्षीय उमेदवार कु.हिमानी नगरे यांची चर्चा तर संपूर्ण जिल्हाभर होतंच आहे पण पोटघन मेजर यांच्या शिरपेचातही यानिमित्ताने मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अडचणीच्या काळात आमदार निलेश लंकेंचे एकनिष्ठ साथीदार ठरलेले मेजर आता पारनेर नगरपंचायतीतही वाॅर्ड क्रमांक ९ चे ‘हुकमी एक्का’ ठरले आहेत. या कामगिरीमुळे त्यांचे आमदार निलेश लंकेंच्या दरबारी एक नंबरचे स्थान आणखी वरचे झाले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम