Patanjali Credit Card:- पतंजली म्हटलं की बहुतेक लोकांच्या मनात लगेच आयुर्वेदिक प्रोडक्ट्स, नैसर्गिक वस्तू आणि स्वदेशी उत्पादनांचीच आठवण येते. पण आता पतंजलीने आपल्या ग्राहकांसाठी केवळ आरोग्यदायी उत्पादनांपुरती मर्यादा ठेवली नाही, तर वित्तीय जगातही एक नवीन पाऊल टाकलं आहे. कंपनीने आपल्या निष्ठावान ग्राहकांसाठी एक खास सुविधा सुरू केली आहे व ती म्हणजे पतंजली क्रेडिट कार्ड होय. या कार्डच्या मदतीने तुम्हाला खरेदी करताना जबरदस्त कॅशबॅक, सूट आणि रिवॉर्ड्सचा फायदा मिळू शकतो.
पतंजली क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

पतंजलीने पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि आरबीएल बँक (RBL Bank) या दोन बँकांसोबत भागीदारी करून को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड्स सादर केली आहेत. या कार्ड्सचा उद्देश म्हणजे पतंजलीच्या ग्राहकांना डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे आणि प्रत्येक खरेदीवर फायदा मिळवून देणे.या कार्ड्सचा वापर केल्यास तुम्ही पतंजली स्टोअर्सवर किंवा इतर ठिकाणी खरेदी करताना रिवॉर्ड पॉइंट्स, कॅशबॅक, विशेष ऑफर्स आणि प्रवासातील सुविधा मिळवू शकता.
आरबीएल बँकेकडून दोन खास पतंजली क्रेडिट कार्ड्स
आरबीएल बँकने दोन प्रकारची पतंजली क्रेडिट कार्ड्स जारी केली आहेत.पतंजली गोल्ड क्रेडिट कार्ड आणि पतंजली प्लॅटिनम क्रेडिट कार्ड होय.या दोन्ही कार्ड्सचा फायदा मुख्यतः पतंजली स्टोअर्सवर खरेदी करणाऱ्यांना होणार आहे. जर तुम्ही पतंजलीचे नियमित ग्राहक असाल, तर या कार्डच्या मदतीने तुम्हाला 10% पर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.त्याचबरोबर, या कार्ड्सच्या धारकांना एअरपोर्ट लाऊंज अॅक्सेस, हॉटेल बुकिंग सूट, मूव्ही तिकीटांवर डिस्काउंट अशा अनेक प्रीमियम सुविधाही मिळतात.
10% कॅशबॅक आणि वार्षिक फी रिफंड
आरबीएल पतंजली प्लॅटिनम कार्डवर 10% कॅशबॅक मिळण्याची सुविधा आहे, ज्याची मर्यादा महिन्याला ₹5000 पर्यंत आहे. या कार्डसाठी वार्षिक फी आकारली जाते, पण जर तुम्ही वर्षभरात ठराविक खर्च केलात, तर ही फी तुम्हाला परत मिळते. म्हणजे कार्ड जवळपास मोफतच मिळते.
🪙पंजाब नॅशनल बँकेकडून दोन कार्ड्स
पंजाब नॅशनल बँकेकडूनही दोन को-ब्रँडेड पतंजली कार्ड्स दिली जातात.त्यात रुपे सिलेक्ट कार्ड आणि रुपे प्लॅटिनम कार्ड यांचा समावेश आहे.या कार्ड्सद्वारे तुम्ही फक्त पतंजली स्टोअर्सवरच नव्हे, तर देशभरातील इतर व्यापाऱ्यांकडूनही खरेदी करू शकता.पहिल्या ट्रान्झेक्शनवरच तुम्हाला 300 पेक्षा जास्त रिवॉर्ड पॉइंट्स, वीमा कव्हरेज, आणि 300+ मर्चंट ऑफर्सचा लाभ मिळतो.
₹2500 पेक्षा जास्त खरेदीवर कॅशबॅक
जर तुम्ही पतंजली स्टोअरमधून ₹2500 पेक्षा जास्त खरेदी केली, तर तुम्हाला 2% कॅशबॅक (जास्तीत जास्त ₹50 प्रति ट्रान्झेक्शन) मिळेल.तसेच, ज्यांच्याकडे पतंजलीचं स्वदेशी समृद्धी कार्ड आहे आणि ते या PNB कार्डच्या मदतीने पेमेंट करतात, त्यांना 5% ते 7% पर्यंत कॅशबॅक मिळतो.











