पटोलेंची पुनहा टीका…’ज्याची बायको पळून गेली, त्याचे नाव मोदी ठेवले’

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सुरु असलेली वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरुच आहे. ‘आता पुन्हा एकदा नाना पटोले यांनी मोदींबाबत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

‘गावगुंड मोदी’ च्या विधानावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. ‘गावगुंडांना गावगुंडच दिसणार आहे.

मुळाच भाजपची काय अवस्था झाली आहे, लोकं हे पाहून हसत आहे. ज्याची बायको पळून जाते त्याचे नाव मोदी ठेवले जात आहे’ असं म्हणत नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे.

त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा भाजप नेते आक्रमक झाले आहे. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं, तसेच पुतळाही जाळण्यात आला आहे.

नाना पटोले हे नाशिकच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत होते. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोले यांनी खोटा गावगुंड आणल्याचा आरोप केला आहे, असा प्रश्न विचारला असता पटोले म्हणाले की, ‘गावगुंडांना गावगुंडच दिसणार आहे. भाजपची काय अवस्था झाली आहे, लोकं हे पाहून हसत आहे.

ज्याची बायको पळून जाते त्याचे नाव मोदी ठेवले जात आहे. असं असताना अजून काय राहिलं आहे. हे प्रश्न विचारण्यापेक्षा मी भाजपला बेरोजगारी, महागाई, गरिबांचे प्रश्न आहे. त्याबद्दल ती बोलत नाही.’

तसंच, ज्या गावागुंडाने याबद्दल खुलासा केला आहे. ज्या मोदीचा उल्लेख झाला ते नाव फक्त एकच नाही. ललीत मोदी असतील, नीरव मोदी असतील हे सुद्धा मोदी आहेच.

त्यामुळे भाजपवाल्यांना नेमकं झालंय तरी काय? माझे पुतळे जाळायचे असतील तर जाळा, माझा पुर्नजन्म होत आहे. तुम्हाला जितके पुतळे जाळायचे असेल जाळा आता एकदिवस तुम्हाला जनताच जाळणार आहे, असा टोलाही पटोले यांनी लगावला

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!