अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने राज्य सरकारने राज्यात तात्काळ टाळेबंदी लागु केली. टाळेबंदीने दुधाची मागणी घटली, परिणामी दुधाचे दर मोठ्या प्रमाणात घसरले.
या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेलद्वारे दुधाला प्रति लीटर ३२ रुपये दर द्या किंवा दुध उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर थेट प्रती लिटर १० रुपये अनुदान मिळावे अशी मागणी देठे यांनी केली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या टप्प्यात लाँकडाऊन करण्यात आलेले आहे. तेव्हा पासुन गायीच्या दुधाचे खरेदी दर प्रती लिटर ३२ रूपयांवरून थेट १९ ते २० रूपयांपर्यंत खासगी व सहकारी दुधसंस्थांनी कमी केलेले आहेत.
शहरांत माञ गायीच्या दुधाचा विक्री दर प्रती लिटर ५० ते ६० रू. आजही कायम आहे. यातुन फक्त खासगी व सरकारी दुधसंस्थांनाच मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होत आहे. एकीकडे दुधाचे दर कमी होत असतानाच पशु खाद्यचे दर मात्र मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
यामुळे ग्रामीण भागातील दुध उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असुन त्याला गायी , म्हशींचा सांभाळ करणे देखील आता जिकिरीचे झाले आहे. १ आँगस्ट २०१८ पासुन गायीच्या दुधाला किमान २५ रू.प्रति ली.
दर देण्याचे तत्कालीन सरकारने घोषित केले होते व राज्यातील खासगी तसेच सहकारी दुधसंस्थांनी देखील ते मान्य केले होते.परंतु आता लाँकडाऊनचे कारण पुढे करून सर्वच दुध संस्थांनी दुध खरेदी दर पाडले असल्याने ग्रामीण भागातील दुध व्यवसाय मोडकळीस आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम