LPG cylinders : भारतातील (India) सर्वसामान्य जनता सध्या महागाईने (inflation) त्रस्त आहे. विशेषत: खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या किमती (food items) आणि इंधनाच्या किमती (fuel prices) या आघाडीवर सर्वसामान्यांची निराशा झाली आहे.
एलपीजीच्या किमती आता हजार रुपयांच्या वर पोहोचल्या आहेत. दरम्यान, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (Petroleum Minister Hardeep Singh Puri) यांनी ट्विट केले की, भारतात एलपीजी सिलिंडरच्या ( LPG cylinders) किमती जगात सर्वात कमी आहेत. ग्राफिक्स शेअर करताना मंत्र्यांनी भारतातील एलपीजीच्या किमतींची जगातील इतर देशांशी तुलना केली आहे.


हरदीप सिंग पुरी यांनी काय केले ट्विट?
पुरी यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे की, मोदी सरकारच्या ‘सिटिझन फर्स्ट’ धोरणांचा परिणाम म्हणून भारतात एलपीजीच्या किमतीत वाढ जागतिक स्तरापेक्षा खूपच कमी आहे. इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे जगभरात एलपीजीच्या किमती वाढल्या आहेत.
पुरी यांनी आपल्या ट्विटमध्ये ग्राफिक्सच्या माध्यमातून विविध देशांतील एलपीजी सिलिंडरच्या किमतीची आकडेवारीही शेअर केली आहे. ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, भारतात 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1053 रुपये आहे.

त्याच वेळी, पाकिस्तानमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1113.73 रुपये आहे. तर सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1243.32.रुपये आहे. सध्या नेपाळमध्ये राहणाऱ्या लोकांना घरगुती एलपीजी सिलेंडरसाठी 1139.93 रुपये खर्च करावे लागतात.
तर ऑस्ट्रेलियातील नागरिकांना घरगुती एलपीजी सिलेंडरसाठी 1764.67 रुपये खर्च करावे लागतात. अमेरिकेत एखाद्याला एलपीजी सिलिंडर हवा असेल तर त्यासाठी 1754.67 रुपये खर्च करावे लागतील. तर कॅनडामध्ये तुम्हाला एलपीजी सिलेंडरसाठी 2411.20 रुपये मोजावे लागतील.
मोदी सरकारमध्ये सिलिंडर केवळ 130 रुपयांनी महागला
हरदीप सिंग पुरी यांच्या म्हणण्यानुसार, मोदी सरकारच्या कार्यकाळात एलपीजी सिलिंडर 130 रुपयांनी महागला आहे. 1 जुलै 2014 रोजी दिल्लीत विनाअनुदानित घरगुती सिलिंडरची किंमत 922.50 रुपये होती. म्हणजेच 25 जुलै 2014 रोजी त्याच दराने घरगुती सिलिंडर उपलब्ध होते.

काही लोकांना त्यावर सबसिडी मिळायची, त्यामुळे त्याची किंमत 400 ते 500 रुपये होती ही वेगळी गोष्ट. विनाअनुदानित सिलिंडर बद्दल बोलायचे झाले तर 8 वर्षात 130 रूपये महाग झाले आहेत.