अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Maharashtra Politics : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगबादमधील सभेनंतर राज्यात काहीच होणार नाही. समाजामध्ये ऐक्य अबाधित राहील.
या सभेनिमित्त त्यांना जे साध्य करण्याचे आहे, ते होणार नाही. त्यांचा हेतू लोकच उधळून लावतील,’ असा विश्वास अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र दिनानिमित्त उद्या मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. त्यासाठी ते आज नगरला आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेसंबंधी ते म्हणाले, ‘या सभेने काहीच फरक पडणार नाही. हिंदू-मुस्लिम ऐक्य अबाधित राहील. मात्र, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करणे योग्य नाही,’ असेही ते म्हणाले.